शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 19:07 IST

INDIA Allaince Maharally: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची महारॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्यात आली. त्यातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. 

नवी दिल्ली - Tejasvi Yadav on BJP ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनिमित्त देशात सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत विरोधी पक्षांनी लोकतंत्र बचाओ महारॅलीचं आयोजन केले. त्यातून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राजधानी दिल्लीत रामलीला मैदानात राहुल गांधींनी मोदींवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर द्वेषाचं राजकारण करत असल्याची टीका केली. 

तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही देशात कुठेही जात आहोत तिथे आम्हाला जनतेचं समर्थन मिळत आहे. देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. आम्ही पहिली पटणा, मग मुंबई आणि आता तिसरी रॅली दिल्लीत करत आहोत. भाजपा सरकार ज्यारितीने देशाचं विभाजन करत आहे, द्वेषाचे राजकारण करत आहे त्याविरोधात होणाऱ्या लढाईत तुम्ही आम्हाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच लोकशाहीत जनता मालक आहे. अबकी बार ४०० पार बोलणारे तोंडावर पडणार आहेत. देशात बेरोजगारी, महागाई, गरिबी हे शत्रू आहेत. मागील काळात मोदींनी सर्व गोष्टींचे खासगीकरण केले. आम्ही १७ महिन्यात बिहारमध्ये ५ लाख लोकांना रोजगार देण्याचं काम केले. आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. युवक त्रस्त आहे परंतु पंतप्रधानांना शेतकऱ्यांना भेटण्याचाही वेळ नाही. मोदी प्रियंका चोप्रा यांना भेटतात, पण शेतकऱ्यांना नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं. 

"तूम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो"

तेजस्वी यादव यांनी या महारॅलीत सरकारने लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही केली नसल्याचा आरोप केला. यासाठी तेजस्वी यादवांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणं, तू तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो असं म्हणत केंद्रीय तपास यंत्रणांकडून ईडी, सीबीआय कारवाईमागे भाजपा असल्याचं सांगितले. आम्ही घाबरणारे नाही. ज्यारितीने हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली. आम्ही वाघ आहोत संघर्षातून मागे हटणार नाही असा इशारा तेजस्वी यादवांनी दिला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालTejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी