नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:11 IST2024-01-02T09:56:02+5:302024-01-02T10:11:49+5:30

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. 

Tejashwi has more wealth than Nitish Kumar | नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

एस.पी.सिन्हा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह त्यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपापल्या संपत्तीची माहिती जाहीर केली.  नितीशकुमार यांच्याकडे १.६४ काेटी रुपयांची संपत्ती असून १३ गायी आणि १० वासरे त्यांच्याकडे आहेत. वर्षभरात त्यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे.

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. 

काय काय आहे नितीशकुमार यांच्याकडे?
स्थायी संपत्तीच्या स्वरूपात शेती किंवा व्यावसायिक इमारत नाही. दिल्लीत त्यांच्या नावाचे १ हजार चाैरस फुटांची सदनिका आहे. सदनिकेचे बाजार मूल्य १.४८ काेटी रुपये आहे. 

तेजस्वी यादव यांची संपत्ती किती? 
तेजस्वी यादव यांच्या नावे विविध बँक खात्यांमध्ये ५४ लाख रुपये जमा आहेत. त्यांची पत्नी राजश्री यांच्याकडे १ लाख रुपये राेख व बँक खात्यांमध्ये ५.५ लाख रुपये जमा आहेत. याशिवाय बरेच साेनेही आहे. 

Web Title: Tejashwi has more wealth than Nitish Kumar