Varun Singh Death: हजारो फुटांवरून तेजस खाली कोसळत होते, पण वरुण सिंहांनी कॉकपिट सोडले नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:12 PM2021-12-15T15:12:54+5:302021-12-15T15:14:22+5:30

Brave IAF Group Captain Varun Singh Lost battel of Life: तो दिवस देखील 8 डिसेंबरच होता, खाली लोकवस्ती होती, समोर मृत्यू दिसत होता, वरुण सिंहांनी कोसळणारे तेजस काही सोडले नव्हते. आजही तोच करिश्मा होईल असे वाटत होते, पण...

Tejas Fighter jet was falling from thousands of feet, but Varun Singh did not leave the cockpit | Varun Singh Death: हजारो फुटांवरून तेजस खाली कोसळत होते, पण वरुण सिंहांनी कॉकपिट सोडले नव्हते

Varun Singh Death: हजारो फुटांवरून तेजस खाली कोसळत होते, पण वरुण सिंहांनी कॉकपिट सोडले नव्हते

Next

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात एकमेव एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. वरुण सिंह यांचे बंगळरुमध्ये उपचारावेळी निधन झाले. याच वरुण सिंहांनी 8 डिसेंबर 2020 मध्ये देखील मृत्यूशी दोन हात केले होते. यंदाही त्यांच्या हेलिकॉप्टरला 8 डिसेंबरलाच अपघात झाला. यामध्ये रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले होते. सिंह एकटे बचावले होते, परंतू आज त्यांची ही झुंज संपली. 

वरुण सिंहांना जेव्हा हेलिकॉप्टरच्या अवशेषांमधून बाहेर काढले तेव्हा ते जिवंत होते परंतू गंभीर जखमी होते. यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बंगळुरुला हलविण्यात आले. रावत यांच्या हेलिकॉप्टरला नेमका कसा अपघात झाला, याची माहिती केवळ वरुण सिंहच देऊ शकत होते. देशाला ते बरे होतील आणि या घटनेची माहिती देतील अशी आशा होती. मात्र, या शूर वीराला वाचविण्यात अपयश आले. 

8 डिसेंबर 2020
हेलिकॉप्टर अपघात होण्याच्या बरोबर एक वर्ष आधी वरुण सिंहांनी 8 डिसेंबर 2020 ला मृत्यूला हरविले होते. एवढेच नाही तर देशाची संपत्ती असलेले तेजस लढाऊ विमान आणि त्याच्या दुर्घटनेत होणारी जिवीतहाणी त्यांनी वाचविली होती. वरुण सिंह तेजस विमान चालवत होते. अचानक विमानाच्या कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला आणि ते विमान हजारो फुटांवरून खाली येऊ लागले. अशा परिस्थितीत पायलटांना कॉकपिटमधून इजेक्ट करण्यास सांगितलेले असते. परंतू वरुण सिंहांनी मृत्यूशी झुंज देण्याचे ठरविले. जरी मृत्यू समोर ठाकला होता तरी त्यांनी कॉकपिट सोडले नाही. लढाऊ विमान लोकवस्तीवर कोसळणार होते. यामुळे अनेकांचे जीव त्यांना दिसले. त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे ठरविले आणि तेजसला हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तेजस जमिनीवर आदळायचे सोडून सुखरुप उतरले. या त्यांच्या धाडसाबद्दल वरुण सिंहांना शोर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत देखील त्यांनी मृत्यूला झुंजविले, पण अखेर ते ही झुंज हरले. कुटुंबालाही ते या अपघातातून वाचतील अशी आशा होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील दोनदा फोन करून माहिती घेत होते. डॉक्टरांशी बोलत होते. साऱ्या देशाचेही लक्ष लागले होते. 

Web Title: Tejas Fighter jet was falling from thousands of feet, but Varun Singh did not leave the cockpit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.