बिहारमधील जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर सरकारी निवासस्थानातील वस्तू गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाटण्यातील २६ एम स्टँड रोडवरील हे निवासस्थान नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री लखेंद्र पासवान यांना देण्यात आले होते. दरम्याम, आता मंत्र्यांनी नवीन आरोप केला आहे. वासस्थानातून सोफा, खुर्च्या, बल्ब आणि पंखे यासारख्या आवश्यक वस्तू गायब झाल्याचा त्यांनी आरोप केला.
मंत्री पासवान म्हणाले की, जेव्हा एखाद्या मंत्र्यांना किंवा आमदारांना निवासस्थान दिले जाते तेव्हा त्यांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तू पुरवल्या जातात. या बंगल्यातील पंखे आणि एअर कंडिशनर काढून टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी दरवाजाचे कडी-कॉलेक्शन तुटलेले आहेत आणि काही ठिकाणी छताचे प्लास्टर निघत आहे.
मंत्र्यांनी सांगितले की,हे निवासस्थान सध्या राहण्यायोग्य नाही. इमारत बांधकाम विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. ते बंगल्याच्या दुरुस्तीनंतरच त्यात राहतील.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यांनी त्यांच्या बहुतेक वस्तू सरकारी निवासस्थानातून त्यांच्या कार्यालयात हलवल्याचे वृत्त आहे. बिहारमधील महाआघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेले तेज प्रताप यादव यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी हा बंगला देण्यात आला होता. त्यावेळी ते हसनपूर मतदारसंघाचे आमदार होते.
महुआ मतदारसंघातून बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, त्यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस इमारत बांधकाम विभागाकडून मिळाली. तेज प्रताप सध्या कोणत्याही संसदेचे सदस्य नाहीत किंवा त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नाही.
तेजस्वी यादव यांच्यावरही आरोप
तेजप्रताप यादव यांचे धाकटे बंधू आणि विरोधी पक्षनेते तेजप्रताप यादव यांच्यावरही सरकारी निवासस्थानांमधून वस्तू चोरीचा आरोप आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जेव्हा त्यांनी पाटणा येथील ५, देशरत्न मार्ग येथील त्यांचा बंगला रिकामा केला तेव्हा भाजप आणि जेडीयू नेत्यांनी त्यांच्यावर नळ, एअर कंडिशनर, पंखा आणि बेडसह अनेक वस्तू चोरीचा आरोप केला.
Web Summary : Tej Pratap Yadav vacated his government bungalow in Patna. A minister alleged items like sofas, fans, and ACs were missing. Similar accusations were made against Tejashwi Yadav for alleged theft from his residence previously. The building is currently uninhabitable.
Web Summary : तेज प्रताप यादव ने पटना में सरकारी बंगला खाली किया। मंत्री ने सोफा, पंखे और एसी गायब होने का आरोप लगाया। तेजस्वी यादव पर भी पहले सरकारी आवास से चोरी के आरोप लगे थे। बंगला वर्तमान में रहने योग्य नहीं है।