तंत्रज्ञान केवळ प्रशासकीय सोय नव्हे, एक घटनात्मक साधन : सरन्यायाधीश सूर्य कांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:46 IST2026-04-12T09:46:17+5:302026-04-12T09:46:41+5:30

Navi Delhi News: तंत्रज्ञान हे आता केवळ एक प्रशासकीय सोय राहिलेले नाही, तर ते एक घटनात्मक साधन झाले आहे. हे एक असे साधन आहे जे कायद्यासमोर समान न्यायाला बळकटी देऊ शकते, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शनिवारी सांगितले.

Technology is not just an administrative convenience, it is a constitutional tool: Chief Justice Surya Kant | तंत्रज्ञान केवळ प्रशासकीय सोय नव्हे, एक घटनात्मक साधन : सरन्यायाधीश सूर्य कांत

तंत्रज्ञान केवळ प्रशासकीय सोय नव्हे, एक घटनात्मक साधन : सरन्यायाधीश सूर्य कांत

नवी दिल्ली - तंत्रज्ञान हे आता केवळ एक प्रशासकीय सोय राहिलेले नाही, तर ते एक घटनात्मक साधन झाले आहे. हे एक असे साधन आहे जे कायद्यासमोर समान न्यायाला बळकटी देऊ शकते, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शनिवारी सांगितले. उपलब्धतेसोबतच आणि न्यायपालिकेला प्रक्रियात्मक संकेतांच्या पलीकडे जाण्याची संधी हे तंत्रज्ञान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘न्यायालयीन प्रक्रियेची पुनर्रचना आणि डिजिटल परिवर्तन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात सरन्यायाधीश बोलत होते. ते म्हणाले की, . एखाद्या व्यक्तीकडे कितीही साधने किंवा परिस्थिती असो, निष्पक्ष, वेळेवर आणि प्रभावीपणे त्याला न्याय मिळायला हवा, हे ते वचन आहे. 

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जितीन प्रसाद यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांसमोर बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, नागरिक, वकील आणि इतर लाभधारकांना खऱ्या अर्थाने कितपत लाभ होतो यावरच न्यायप्रणालीतील सुधारणांचा ताळेबंद आखला जाऊ शकतो. 

 कायदे व आदेशात स्पष्टता हवी : मेघवाल
याप्रसंगी बोलताना कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, न्याय, जीवन आणि व्यवसायात सूत्रबद्धता आणण्यासाठी कायदा सहजपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कायदे आणि आदेशात अधिक स्पष्टता असेल तर ते कार्यान्वित करणे अधिक सोपे होईल. 
१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था अशी शक्य नाही : केवळ भांडवल व धोरणांच्या माध्यमातून भारत १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकत नाही. यात कायदेप्रणालीतील गुणवत्ता एक महत्त्वाचा घटक असेल, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

Web Title : प्रौद्योगिकी: केवल प्रशासनिक सुविधा नहीं, बल्कि एक संवैधानिक उपकरण: सीजेआई कांत

Web Summary : मुख्य न्यायाधीश सूर्य कांत ने कहा कि प्रौद्योगिकी कानून के समक्ष समान न्याय को मजबूत करती है। उन्होंने प्रशासन से परे प्रौद्योगिकी की भूमिका पर जोर दिया, जो सभी के लिए निष्पक्ष, समय पर न्याय सुनिश्चित करती है, चाहे परिस्थितियाँ कैसी भी हों। कानून मंत्री मेघवाल ने कानूनों को आसान बनाने के लिए स्पष्टता पर जोर दिया।

Web Title : Technology: Not just administrative ease, but a constitutional tool: CJI Kant

Web Summary : Technology strengthens equal justice before the law, said Chief Justice Surya Kant. He emphasized technology's role beyond administration, enabling fair, timely justice for all, regardless of circumstances. Law Minister Meghwal stressed clarity in laws for easier implementation.