शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नारीशक्तीचा विजय असो... 'जग जिंकून' मायदेशी परतल्या भारताच्या सहा 'जलसम्राज्ञी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 6:46 PM

चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी  आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या.

पणजी - चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी  आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या. या दलाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी केले.  पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.  वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता. या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी वापरण्यात आलेल्या आयएनएस तारिणीबाबत माहिती देताना लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल म्हणाल्या, आयएनएस म्हादेईनंतर आयएनएस तारिणी ही अशा प्रकारची दुसरी नौका आहे. तिची बांधणी समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम अशी करण्यात आली आहे. वुडन फायबर-ग्लासने बनलेली ही नौका अनेक बाबतीत उत्तम असून, या प्रवासात तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. दरम्यान, जगप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या भारताच्या जलसम्राज्ञींचे स्वागत करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,"  तुम्ही मिळवलेल्या यशाबाबत मी आनंदी आहे. भारताची युवा पिढी जे काही मिळवत आहेत, ते महिला आणि पुरुष दोघांसाठीही खूप प्रेरणादायी आहे." 

   मोठ्या संकटाचा सामना 

एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिका-यांनी समुद्रात घालवले. या परिक्रमेत सहभागी पथकाचे नेतृत्त्व करणाº-या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी अनुभव कथन करताना सांगितले की, ‘पहिले विषुववृत्त ओलांडल्यानंतर प्रवासाला गती आली. २३ आॅक्टोबर रोजी बोट आॅस्ट्रेलियात पोचली. तेथे बंदरात १२ दिवस राहिलो. ७ नोव्हेंबर रोजी प्रवासात असतानाच पायल हिचा वाढदिवस साजरा केला. केप होर्न बंदर ओलांडण्याआधीच मोठ्या संकटाचा सामना या अधिका-यांना करावा लागला. खराब हवामानामुळे समुद्र खवळला होता ताशी ६0 किलोमिटर वेगाने वाहणारे वारे आणि ८ मीटर उंचीच्या लाटा यातून मार्ग काढावा लागला. प्रत्यक्षात यमदूतच परीक्षा घेत होता. शेवटी हे बंदर पार करुन २६ फेब्रुवारी रोजी फॉकलँड बेटावर पोचलो. 

 बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड 

पोर्ट लुईपासून १८0 सागरी मैल अंतरावर असताना बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड झाला. समुद्रातच तात्पुरती दुरुस्ती करुन बोट बंदरात आणावी लागली. नौदलाने तात्काळ सुटे भाग पुरविल्याने लवकर दुरुस्ती झाली आणि पुढच्या प्रवासाला लागलो.  २८ एप्रिल रोजी पोर्ट लुई बंदरातून परतीच्या प्रवासाला लागलो. ६ मे रोजी विषुववृत्त पार केले. 

 उद्या पंतप्रधानांची भेट 

सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिका-यांचे हे पथक उद्या बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या साहसी प्रवासाचा अनुभव त्यांना कथन करणार आहे. मोदीजी या अधिका-यांशी संवाद साधतील. कार्यक्रमाला नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनिल लांबा तसेच नौदलाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत