शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक की वैरी?... गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 168 वेळा थोबाडीत मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 18:08 IST

एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे.

झाबुआ-  मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्हातील एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. गृहपाठ न केल्याने वर्गातीलच मुलींकडून सहा दिवस सतत या 12 वर्षीय मुलीला 168 वेळा थोबाडीत मारण्यात आल्या. विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. 

जिल्हा मुख्यालयापासून 34 किलोमीटर अंतरावर थांदला तहसील मुख्यालयाजवळ जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी आहेत. अनुष्का सिंह असं तिचं नाव असून तिचे वडील शिवप्रताप सिंह यांनी तीन दिवस आधी या प्रकरणाची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली. मुलीची तब्येत ठिक नसल्याने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं ज्यामुळे ती अभ्यास मागे पडली आहे. 

आजारपणातून बरी झाल्यानंतर अनुष्का 11 जानेवारी रोजी पुन्हा शाळेत गेली. त्यादिवशी गृहपाठ न केल्याने विज्ञान विषयाचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी अनुष्काच्या गालावर तिच्या वर्गातील 14 मुलींना 11 ते 16 जानेवारी म्हणजेच सहा दिवस रोज 2-2 थोबाडीत मारायला सांगितल्या. या मारहाणीमुळे अनुष्काला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला असून ती पुन्हा आजारी पडली. शिक्षकाच्या या कृत्यामुळे अनुष्का घाबरली असून तिला शाळेत जायलाही भीती वाटते आहे. अनुष्कावर थांदलाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अनुष्काच्या वडिलांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. 

पीडित मुलीच्या वडिलांकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मेडिकल तपासात मुलीला जखम झाल्याचं आढळून आलं नाही. पण तिच्या वर्गातील मुलींनी या घटनेला दुजोरा दिला आहे, अशी माहिती थांदला पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक एसएल बघेल यांनी दिली. यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक के. सागर यांनी शिक्षकाचा बचाव करत या शिक्षेला फ्रेंडली शिक्षा म्हंटलं आहे. जी मुलं अभ्यासात मागे असतात त्यांना विद्यालया नियमांनुसार शिक्षक शिक्षा देऊ शकत नाही. मुलीमध्ये सुधारण व्हावी म्हणून शिक्षक वर्माने इतर मुलींना सांगून तिला शिक्षा दिली. पण इतर मुलींनी तिला जोरात मारलं नाही. ही एक फ्रेंडली शिक्षा आहे पण तरीही या प्रकरणावर लक्ष दिलं जाईल. मुलीच्या पालकांना बोलावून याविषयावर चर्चा केली जाईल, असं स्पष्टीकरण शाळेचे मुख्याध्यापक के.सागर यांनी दिलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीSchoolशाळाCrimeगुन्हा