शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चहा विक्रेत्याच्या मुलीला 3.8 कोटींची मिळाली शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 1:06 PM

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

ठळक मुद्देचहा विक्रेत्याच्या मुलीला मिळाली 3.8 कोटींची शिष्यवृत्तीमेरिकेतील बॉबसन महाविद्यालयात प्रवेश मिळालाबारावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली

बुलंदशहर : उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सुदीक्षा भाटी असे या मुलीचे नाव असून तिने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत 98 टक्के मार्क्स मिळविले आहेत. गरिबीवर मात तिने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.बारावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून सुदीक्षा भाटी जिल्ह्यात पहिली आली आहे. तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉबसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तसेच, या चार वर्षाच्या कोर्ससाठी तिला 3.8 कोटींची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. यावेळी सुदीक्षा भाटी म्हणाली की, सुरुवातीला शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न मला कठीण वाटत होते. 2011 मध्ये मला विद्याज्ञान लीडरशीप अकादमी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर शिक्षण सुरू ठेवणे मला सोपे झाले. या शाळेत मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिकतात. त्यामुळे मलाही या शाळेत शिकण्याची संधी मिळाली. मात्र, सुरुवातीच्या काळात माझ्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शिक्षणासाठी विरोध दर्शविला होता. परंतू माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिष्यवृत्ती मिळाल्याचे समजल्यानंतर, माझी आई खूप खूश झाली. कारण, तिची देवाने प्रार्थना ऐकली असे तिला वाटते. मात्र, माझ्या वडिलांना दुस-या देशात जाऊन शिक्षण घेण्यासंदर्भात थोडी शंका होती. आता अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची आणि माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याची संधी मला मिळेल, असे सुदीक्षा भाटी हिने सांगितले. विद्याज्ञान लीडरशीप अकादमीची स्थापना 2009 मध्ये शिव नडार फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. सद्दस्थितीला बुलंदशहर आणि सीतापूरमधील 1900 हून अधिक गरीब कुटुंबातील मुले या अकादमीत शिक्षण घेत आहेत. 

टॅग्स :educationशैक्षणिकUttar Pradeshउत्तर प्रदेश