शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारखरेदीतून होते करचोरी! दरवर्षी खरेदी होतात 25 लाख कार

By admin | Updated: December 27, 2016 20:29 IST

दहा लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या देशात केवळ 24 लाख इतकी आहे. पण असे असतानाही देशात दरवर्षी 25 लाख नव्या कारची खरेदी होत असल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात कर चुकवण्यासाठी तसेच काळ्याचे पांढरे करण्यासाठी वापरण्यात येत असलेले विविध हातखंडे उघडकीस येत आहे. दहा लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या देशात केवळ 24 लाख इतकी आहे. पण असे असतानाही  देशात दरवर्षी 25 लाख नव्या कारची खरेदी होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्यातील 35 हजार कार ह्या आलिशान श्रेणीतील असतात.  गेल्या पाच वर्षांपासून एवढ्याच संख्येने कारची खरेदी होत असल्याचे  एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 
याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे अधिकारी म्हणाले, "125 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 2014-15 साली केवळ 3.65 कोटी लोकांनी आयटी रिटर्न भरला   होता. देशात असे खूप लोक आहेत ज्यांचे उत्पन्न अधिक आहे, पण ते करचौकटीच्या बाहेर आहेत." 
देशातील कारखरेदी करण्याची कुवत असलेल्या व्यक्तीपैकी बहुतांश लोक कराच्या चौकटीतून बाहेर असल्याचे सांगत हे अधिकारी पुढे म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांत देशात दरवर्षी सरासरी 25 लाख कार खरेदी केल्या गेल्या. गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे 25.03 लाख, 26 लाख आणि 27 लाख कार खरेदी करण्यात आल्या आहेत."
तसेच प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार देशातील केवळ 48 हजार 417 लोकांनीच आपले वार्षिक उत्पन्न एक कोटींपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही देशात दरवर्षी  बीएमडब्ल्यू, जग्वार, मर्सिडिझ आणि पाँर्शसारख्या 35 हजार महागड्या गाड्यांची खरेदी होते.