शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाखभर मिळकती कारवाईच्या रडारवर निवासी कर आकारणी ; प्रत्यक्षात वापर व्यावसायिक महापालिकेकडून तपासणी सुरू ( लोकमत विशेष )

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

पुणे : महापालिकेकडून मिळकतीचा निवासी वापर सुरू असल्याचे दाखवून प्रत्यक्षात संबधित मिळकत व्यावसायिक म्हणून वापर करून कोटयावधीचा मिळकतकर बुडविणा-यांना आता चाप बसणार आहे. अशा मिळकतधारकांची कुंडली तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी महावितरण, एलबीटी विभाग आणि सेवाकर तसेच व्हँटच्या खातेदारांची माहिती महापालिकेकडून या विभागांकडून मागविण्यात आली आहे. या माहितीवरून मिळकतीचा व्यावसायिक वापर सुरू असतानाही कर मात्र, निवासी स्वरूपाचा भरणा-याचे पितळ यामुळे उघडे पडणार आहे.

पुणे : महापालिकेकडून मिळकतीचा निवासी वापर सुरू असल्याचे दाखवून प्रत्यक्षात संबधित मिळकत व्यावसायिक म्हणून वापर करून कोटयावधीचा मिळकतकर बुडविणा-यांना आता चाप बसणार आहे. अशा मिळकतधारकांची कुंडली तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी महावितरण, एलबीटी विभाग आणि सेवाकर तसेच व्हँटच्या खातेदारांची माहिती महापालिकेकडून या विभागांकडून मागविण्यात आली आहे. या माहितीवरून मिळकतीचा व्यावसायिक वापर सुरू असतानाही कर मात्र, निवासी स्वरूपाचा भरणा-याचे पितळ यामुळे उघडे पडणार आहे.
महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नासाठी स्थानिक संस्था कर ( एलबीटी) पाठोपाठ मिळकतकर हा सर्वात प्रमुख स्त्रोत आहे. त्यातच एलबीटी बंद होणार असल्याने महापालिकेवर आर्थिक संकट कोसळयाची भिती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मिळकती शोधण्यात येत आहेत. शहरात जवळपास साडेसात लाख मिळकतींना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. त्यातील जवळपास पावने दोन लाख मिळकती व्यावसायिक कर आकारणी केली जाते. एकीकडे शहराची आर्थिक उलाढाल कोटयावधींनी वाढत असताना, दुसरीकडे मात्र, या व्यावसायिक मिळकतींचा आकडा गेल्या चार ते पाच वर्षात एवढयावरच स्थिरावला आहे. त्यामुळे पालिकेकडून या करबुडयांवर कारवाईसाठी कंबर कसण्यात आली असून लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.
=========================
महापालिकेच्या हददीतील सर्व इमारती व मोकळया जागांची कर आकारणी पालिकेकडून केली जाते. हा कर बसविण्यासाठी प्रत्येक मिळकतीचे वाजवी अंदाजेभाडे विचारात घेऊन वार्षिक करपात्र रक्कम निश्चित केली जाते. त्यात निवासी, बिगर निवासी ( व्यावसायिक ) , मोकळया जागा अशा प्रकारच्या बिलांचा समावेश आहे.त्यानुसार निवासी मिळकतीसाठी कमी तर व्यावसायिक मिळकतीसाठी जादा कर आकारला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात निवासी मिळकतींची कर आकारणी करून घेऊन या मिळकतींचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आला आहे. त्यात हॉटेल, लहान स्वरूपाची दुकाने, खासगी संस्थासाठीची ऑफीसेस, लहान आयटी कंपन्या, अंगणवाडया सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी जवळपास 100 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.
=======================
शहरात अनेक मिळकतींचा व्यावसायिक वापर सुरू आहे. मात्र, कर निवासीच भरला जात आहे. या मिळकतींचा शोध घेण्यासाठी एलबीटी, सेवाकर, तसेच महावितरणला व्यावसायिक दराने वीज बिल भरणा-या ग्राहकांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वापर बदल करण्यात आलेल्या मिळकतींची माहिती समोर येण्यास मदत होईल. - सुहास मापारी (उपायुक्त.कर आकारणी व संकलन विभाग)
आणखी चौकटी आहेत....