शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कंपन्यांच्या करचुकवेगिरीला चाप

By admin | Updated: February 11, 2015 23:57 IST

आयकर विभागाने आम आदमी पार्टी, काँग्रेससह दिल्लीतील ५० वर कंपन्यांना बुधवारी नोटीस जारी करीत धडक कारवाईचे संकेत दिले आहेत

नवी दिल्ली : आयकर विभागाने आम आदमी पार्टी, काँग्रेससह दिल्लीतील ५० वर कंपन्यांना बुधवारी नोटीस जारी करीत धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. धनादेशाच्या माध्यमाने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग अवलंबला जात असून बनावट कंपन्यांच्या नावावर होत असलेल्या या करबुडवेगिरीला आळा घालण्यासाठी आयकर विभाग सरसावला आहे.अनेक बनावट कंपन्या किंवा एन्ट्री आॅपरेटर कंपन्यांमार्फत बेकायदा रोख कायदेशीर पैशात रूपांतरित करण्याचे प्रकार सुरू आहेत. राजकीय पक्षांना काळा पैसा देणगी रूपात देत तो पांढरा केला जात आहे. यापूर्वी कोलकात्यात अशी प्रकरणे प्रकाशात आली होती, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांच्या सूत्रांनी सांगितले.दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल चौफेर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असलेल्या आम आदमी पार्टीला आयकर विभागाने निवडणूक निधीबाबत नोटीस पाठविल्याचे वृत्त सर्वप्रथम धडकले. गेल्यावर्षी चार बनावट कंपन्यांकडून आम आदमी पार्टीला दोन कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा आरोप या पक्षातून फुटून निघालेल्या स्वयंसेवी गटाने केल्यानंतर दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान आरोपांचा धुरळा उठला होता. या प्रकरणाची दखल घेत आयकर विभागाने ‘आप’ला १६ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचा आदेश देतानाच अन्यथा १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता. गोल्डमाईन बिल्डकॉन प्रा. लिमिटेड, सनव्हिजन एजन्सीज प्रा. लिमिटेड, स्कायलाईन मेटल्स अ‍ॅॅण्ड अलॉय प्रा. लिमिटेड, इंफोलॉस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांनी आपला १५ एप्रिल २०१४ रोजी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे धनादेश दिल्याचा आरोप स्वयंसेवी गटाचे करणसिंग आणि गोपाल गोयल यांनी केला होता. आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी हे आरोप फेटाळताना हे पक्षाविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही निवडणुकीपूर्वी म्हणजे ७ फेब्रुवारीच्या आधीच याबाबत तपासाचे आदेश देण्याचे, दोषी असल्यास अटक करण्याचे आवाहन केले होते, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)