शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Tata in Defense Sector: अखेर रतन टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल; एअरबससोबत मिळून हवाई दलासाठी विमाने बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:25 PM

Tata Group, Airbus deal for Indian Air Force: सी-295 विमाने हवाई दलाच्या जुनाट झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. उर्वरित 40 विमाने भारतात बनविली जातील. 

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने ‘सी-295’ या 56 मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास 22000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षणावरील कॅबिनेट कमिटीने यासाठी नुकताच हिरवा झेंडा दाखविला होता. महत्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनविण्यात येणार असून टाटा सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहेत. राफेलनंतर ही दुसरी मोठी डील आहे जी भारतीय कंपनीसोबत मिळून केली जाणार आहे. (Govt seals mega deal with Airbus for purchase of 56 C-295 military transport aircraft. ) 

या डीलमुळे येत्या काही वर्षांत भारतात 6000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशात हवाई क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार हा एकप्रकारचा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यामध्ये खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनविणार आहे. आतापर्यंत हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे ही जबाबदारी होती. आता पहिल्यांदा खासगी कंपनी लष्करासाठी लष्करी विमाने बनविणार आहे. 

या डीलनुसार 16 विमाने एअरबस डिफेन्स स्पेनवरून आयात केले जाणार आहेत. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या आसपास जागा शोधण्यात येत आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील प्रकल्प उभा करता येऊ शकतो. देशात 2012 पासून C295MW ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टच्या दिशेने काम सुरु आहे. यंदा त्याचा प्रस्ताव सीसीएसकडे पाठविण्यात आला होता. 

सी-295 विमाने हवाई दलाच्या जुनाट झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. उर्वरित 40 विमाने भारतात बनविली जातील. 

टॅग्स :Tataटाटाindian air forceभारतीय हवाई दल