तारसा....
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:46+5:302015-02-16T21:12:46+5:30
स्मशानभूमीची दैनावस्था

तारसा....
स मशानभूमीची दैनावस्थाटिनाचे शेड जीर्ण : नवेगाव (आष्टी) येथील प्रकार तारसा : नजीकच्या आष्टी (नवेगाव) ग्रामपंचायत अंतर्गत असलेले नवेगाव हे छोटेसे गाव. मृतांच्या अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्मशानभूमीची व्यवस्था केली. परंतु या स्मशानभूमीची सध्या चांगलीच दैनावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.नवेगाव येथील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी आष्टी मार्गावर टिनाचे शेड उभारून स्मशानभूमीचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतु स्मशानभूमीतील टिनाचे शेड जीर्ण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मृतदेहाला मुखाग्नी कुठे द्यावा, असा प्रश्न निर्माण होतो. या स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामामुळे शेडखाली असलेल्या ओट्याची खस्ता अवस्था आहे. परंतु, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली. पावसाळ्याच्या दिवसांत अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष पुरवून शेड व सिमेंट ओट्याचे बांधकाम करावे. तसेच या परिसरातील झुडपे तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)