targets army vehicle near Pulwama, nine jawans injured in IED blast | पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी
पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करून घडवण्यात आलेल्या या स्फोटात ९ जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे.  सर्व जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
पुलवामामधीली अरिहर गावातील अरिहल-लस्सीपुरा रस्त्यावर लष्कराचे चिलखती वाहन जात असताना हा आयईडी स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यात लष्कराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. 

 जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, हा स्फोट झाल्यानंतर लष्कराने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. दहशतवादी आपल्या इराद्यांमध्ये असफल ठरले असून, सर्व जवान सुरक्षित  आहेत. काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.  


Web Title: targets army vehicle near Pulwama, nine jawans injured in IED blast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.