तारसा... जोड
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:09+5:302014-12-25T22:41:09+5:30
सुंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहार पटसंख्येनुसार शिजविला जात नाही. धान्याची योग्य साफसफाई न करताच अन्न शिजविल्या जाते. तेच अन्न विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता, मुले घरून डबा आणतात, त्यामुळे आहार कमी शिजविला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा मांगली तेली शाळेत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. येथील शाळेत तांदळाला अळ्या लागल्या असून स्वयंपाकगृहात लोखंडी सामान ठेवले असल्याचे दिसून आले. अशा निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार तालुक्यातील शाळांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील चिचोली, दहेगाव, पिपरी, खंडाळा, राजोली आदी गावातील शाळांत अशाचप्रकारे आहार पुरविल्या जात असल्याची पालकांची ओरड आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील भाजीपाल्याची चवदार चटणी बनवून खाणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन कुठली कारवाई करेल, याकडे पालकांचे ल

तारसा... जोड
स ंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहार पटसंख्येनुसार शिजविला जात नाही. धान्याची योग्य साफसफाई न करताच अन्न शिजविल्या जाते. तेच अन्न विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता, मुले घरून डबा आणतात, त्यामुळे आहार कमी शिजविला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा मांगली तेली शाळेत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. येथील शाळेत तांदळाला अळ्या लागल्या असून स्वयंपाकगृहात लोखंडी सामान ठेवले असल्याचे दिसून आले. अशा निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार तालुक्यातील शाळांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील चिचोली, दहेगाव, पिपरी, खंडाळा, राजोली आदी गावातील शाळांत अशाचप्रकारे आहार पुरविल्या जात असल्याची पालकांची ओरड आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील भाजीपाल्याची चवदार चटणी बनवून खाणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन कुठली कारवाई करेल, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. चौकट....दोन शिक्षक अन् वर्ग पाचचारभा जिल्हा परिषद शाळेतदेखील विद्यार्थ्यांसाठी मेन्यूनुसार आहार शिजविला जात नाही. आहार शिजविण्याची जबाबदारी एका स्थानिक महिलेकडे देण्यात आली आहे. या शाळेत शाळा सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजविल्या जाते. ते दुपारी विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. विशेष म्हणजे येथील शाळेत दोन शिक्षक अन् पाच वर्ग अशी स्थिती आहे. एखाद्या दिवशी एक शिक्षक गैरहजर असल्यास एकाच खोलीत पाचही वर्ग भरविली जातात. अशावेळी वर्ग पाच आणि शिक्षक एक, त्यामुळे शिक्षकांचीदेखील मोठी दमछाक होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.