शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत मतपत्रिकांशी छेडछाड; सुप्रीम कोर्टाने फटकारले, दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 08:18 IST

चंडीगड महापौर निवडणूक; सरन्यायाधीशांनी फटकारले, व्हिडीओ रेकॉर्डिंग व मतपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मतपत्रिकांशी छेडछाड करण्याचा झालेला प्रकार ही लोकशाहीची थट्टा आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या निवडणुकीशी संबंधित असलेल्यांना सुनावले आहे. सदर निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व मतपत्रिका जतन करून ठेवण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा दावा करणारी याचिका आम आदमी पक्षाच्या नगरसेवक व आप-कॉंग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यात त्यांनी भाजपचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांची हकालपट्टी करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चंडीगड महापालिका, त्यातील अधिकारी यांना समन्स बजावले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेचा व्हिडीओ बघितला. त्यानंतर परखड मते व्यक्त केली.

निवडणूक अधिकारी कॅमेऱ्याकडे काय पाहत होते? निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेत छेडछाड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. ते कॅमेऱ्याकडे का पाहत होते? निवडणूक अधिकाऱ्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही. कृपया त्यांना सांगावे की सर्वोच्च न्यायालयाचे तुमच्याकडे लक्ष आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

सरन्यायाधीश म्हणाले... : मतपत्रिकांशी निवडणूक अधिकाऱ्यांनी छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ही लोकशाहीची थट्टा आहे. या साऱ्या प्रकाराने आम्ही स्तंभित झालो आहोत. आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही.

आपने दिले आव्हानचंडीगडमध्ये नव्याने महापौरपदाची निवडणूक घेण्याबाबत कोणताही अंतरिम दिलासा देण्यास पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्या निर्णयाला आपच्या नगरसेवकांपैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

काय घडले हाेते?३० जानेवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बहुमतातील काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मनोज सोनकर या भाजप उमेदवाराने १६ मते मिळवून आपच्या कुलदीप कुमार यांचा पराभव केला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकchandigarh-pcचंडीगढ़Politicsराजकारण