शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भाजपानं दुकानावर टाकला बहिष्कार अन् घडला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 10:46 PM

भाजपानं बहिष्काराची हाक देताच दुकानदाराचं नशीब फळफळलं

भाजपानं बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्यानंतर दुकानाच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचा दावा तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधील एका दुकानदारानं केला. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपानं व्ही. करप्पन यांच्या 'करप्पन सिल्क' दुकानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर दुकानात येणाऱ्या द्राविडी लोकांचं प्रमाण वाढू लागलं. त्यामुळे दुकानाच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचा दावा करप्पन यांनी केला. कोईम्बतूरमध्ये व्ही. करप्पन यांचं 'करप्पन सिल्क' नावाचं दुकान आहे. ७० वर्षांचे करप्पन निरीश्वरवादी विचारसरणीचे आहेत. त्यांनी हातमागाशी संबंधित दोन पुस्तकं लिहिली आहेत. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना करप्पन यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपानं केला आहे. द्रविड इयक्का तमिझार पेरावाई संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. भाजपानं आक्रमक पवित्रा घेताच व्ही. करप्पन यांनी स्पष्टीकरण दिलं. मला कोणाच्याही देवदेवतांचा किंवा धर्माचा अपमान करायचा नव्हता, असं करप्पन यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानं भाजपाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांचं समाधान झालं नाही. हिंदूंनी करप्पन यांच्या दुकानावर बहिष्कार घालावा, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे करप्पन सिल्कच्या विक्रीवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. करप्पन सिल्कवरील बहिष्काराचा मुद्दा सोशल मीडियावर पेटला. यानंतर द्रविडी संघटना एकवटल्या. या संघटनेच्या सदस्यांनी आणि समर्थकांनी करप्पन सिल्कला भेटी देण्यास सुरुवात केली. यामुळे करप्पन सिल्कच्या विक्रीत मोठी वाढ झाली. आधी दुकानातून दिवसाकाठी काही हजारांचा व्यवसाय व्हायचा. मात्र आता तो आकडा लाखांच्या घरात गेल्याचं करप्पन यांनी सांगितलं. मी माझ्या विधानाबद्दल आधीच माफी मागितली आहे. आम्ही कोणत्याही जातीच्या, धर्माच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. मी माझ्या पुस्तकांमधून भाजपाच्या कामाचं कौतुकदेखील केलं आहे, असं करप्पन म्हणाले. राजा यांनी माझ्या दुकानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी ट्विट केलं. मी त्यांचे आभार मानतो, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.  

टॅग्स :BJPभाजपा