मस्तच! ना बाईक, ना कार... गेली 23 वर्षे थेट सायकलने कामाला जातात 'या' सब-इन्स्पेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:42 IST2023-02-07T17:32:19+5:302023-02-07T17:42:35+5:30
सब-इन्स्पेक्टर जी पुष्पराणी यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

फोटो - NBT
45 वर्षीय सब-इन्स्पेक्टर जी पुष्पराणी यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जी पुष्पराणी या कार किंवा बाईकवरून नाही तर थेट सायकलवरून पोलीस ठाण्यात येतात. गेल्या 23 वर्षांपासून त्या सायकलवरून येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1997 च्या बॅचच्या पोलीस अधिकारी, पुष्पराणी यांनी तामिळनाडू विशेष पोलीस आणि नंतर सशस्त्र राखीव दलात ग्रेड II कॉन्स्टेबल म्हणून कामाला सुरुवात केली.
पुष्पराणी यांनी "मी पुडुपेट आर्म्ड रिझर्व्हमध्ये असताना सायकलवरून काम करायला सुरुवात केली. माझे वडील गोविंदासामी, सेवानिवृत्त अधिकारी आहेत. तेही सायकलवरून कामावर जायचे. त्यांनी मला सुरक्षितपणे सायकल कशी चालवायची हे शिकवले. त्यानंतर मी सायकल चालवणं कधी सोडलंच नाही" असं म्हटलं आहे. पुष्पराणी यांनी करियरचा बराचसा काळ शहरातील विविध महिला पोलीस ठाण्यात घालवला आहे.
सायकलिंगमुळे मला ऊर्जा मिळते आणि अनेक आजार दूर राहतात. मी दररोज ऑफिस ते काम आणि परत येण्यासाठी जवळपास 6 किमी सायकल चालवते. याशिवाय मी कमिश्नर ऑफिस आणि इतर कर्तव्याच्या ठिकाणी सायकलने फिरत असं पुष्पराणी यांनी म्हटलं आहे.
पोलीस खात्यातील अनेकजण त्यांची बाईक घेण्यासाठी समजूत काढतात पण सायकल चालवण्याची त्याची इच्छा कायम आहे. ही माझी सातवी सायकल असून ती मला पोलीस आयुक्त शंकर जिवाल यांनी भेट दिल्याचं पुष्पराणी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"