भाजपा जिल्हा सचिवाच्या कारवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:13 IST2018-03-21T09:04:04+5:302018-03-21T09:13:04+5:30

कोईम्बतूरमधील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना ताजी असताना आता भाजपाच्या जिल्हा सचिवाच्या कारवरच पेट्रोल बॉम्बनं हल्ला करण्यात आला आहे. 

Tamil Nadu: A petrol bomb was hurled at the car of BJP district secretary in Coimbatore | भाजपा जिल्हा सचिवाच्या कारवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला 

भाजपा जिल्हा सचिवाच्या कारवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला 

कोईम्बतूर - कोईम्बतूरमधील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना ताजी असताना आता भाजपाच्या जिल्हा सचिवाच्या कारवरच पेट्रोल बॉम्बनं हल्ला करण्यात आला आहे. तामिळनाडूतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली आहे. बुधवारी (21 मार्च) सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी कोईम्बतूरचे भाजपा जिल्हा सचिवांच्या कारवर पेट्रोल बॉम्बनं निशाणा साधण्यात आला. या हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहे. 




 


भाजपा कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
यापूर्वी कोईम्बतूरमधील भाजपा कार्यालयावरही पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता.  7 मार्चला पहाटे 3.20 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता.  दोन पेट्रोल बॉम्बपैकी एक बॉम्ब इमारतीवर असणाऱ्या फ्लेक्स बोर्डावर आदळला तर दुसरा बॉम्ब पक्ष कार्यालयासमोरील वीकेके मेनन रोडवर फुटला होता. पक्ष कार्यालयात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली होती. 
 





 

Web Title: Tamil Nadu: A petrol bomb was hurled at the car of BJP district secretary in Coimbatore

टॅग्स :BJPभाजपा