तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ, जयललितांचा विश्वासू, माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता DMK मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:17 IST2026-02-27T11:15:36+5:302026-02-27T11:17:11+5:30
Tamil Nadu Assembly Election: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू आणि तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ओ. पनीरसेल्वम यांनी आज सत्ताधारी द्रमुक पक्षात प्रवेश केला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ, जयललितांचा विश्वासू, माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता DMK मध्ये
काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू आणि तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ओ. पनीरसेल्वम यांनी आज सत्ताधारी द्रमुक पक्षात प्रवेश केला. ओ. पनीरसेल्वम यांची काही काळापूर्वी अण्णा द्रमुक पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली होती.
ओ. पनीरसेल्वम यांनी तीन वेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. तसेच अण्णा द्रमुक (एआयएडीएमके)पक्षाच्या प्रमुख प्रमुख असलेल्या जयललिता यांचे ते विश्वासू नेते होते. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्यामध्ये अण्णा द्रमुकच्या नेतृत्वावरून दीर्घकाळ संघर्ष झाला. अखेरीस पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता पनीरसेल्वम यांनी थेट अण्णा द्रमुकचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेमध्ये प्रवेश केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पनीरसेल्वम यांनी डीएमकेमध्ये प्रवेश केल्याने त्याचा परिणाम दक्षिण तामिळनाडूमधील मतदारांवर होऊ शकतो, असा अंदाज राजकीय अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. दक्षिण तामिळनाडूमधी थेवर समुदायामध्ये पनीरसेल्वम यांचा समर्थक वर्ग लक्षणीय प्रमाणात आहे.
முன்னாள் முதலமைச்சரும் அருமைச் சகோதரருமான திரு. ஓ.பன்னீர்செல்வம் அவர்கள் தாய்க்கழகமாம் திராவிட முன்னேற்றக் கழகத்தில் இணைந்துள்ளார். அவரை வருக வருக என வரவேற்கிறேன்.
— M.K.Stalin - தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) February 27, 2026
திராவிட இயக்கத்தின் மாபெரும் தலைவரின் பெயரைத் தாங்கிய அவர் திராவிட இயக்கக் கொள்கை காக்கும் நம் பேரியக்கத்தில்… pic.twitter.com/I2YoNAxgis
ओ. पनीरसेल्वम हे २००१ मध्ये पहिल्यांदा तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मात्र सहा महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हाही केवळ एक महिन्यातच त्यांना पद सोडावे लागले होते. पुढे २०१६ मध्ये पनीरसेल्वम तिसऱ्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले होते. तेव्हाही त्यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द अल्पकालीन ठरली होती. तसेच २०१७ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.