शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता विजय निवडणुकीच्या रिंगणात, तामिळनाडूतील ‘या’ दोन मतदारसंघातून लढणार, TVK ने प्रसिद्ध केली उमेदवारांची यादी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:04 IST

Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या टीव्हीकेने आज आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, टीव्हीकेचा प्रमुख असलेला अभिनेता विजय हा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 

दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता विजय याने स्थापन केलेला टीव्हीके पक्ष तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या टीव्हीकेने आज आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, टीव्हीकेचा प्रमुख असलेला अभिनेता विजय हा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत विजय याच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज टीव्हीके पक्षाने राज्यातील सर्व २३४ जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. टीव्हीकेचा प्रमुख विजय हा स्वत: त्रिची पूर्व आणि चेन्नईमधील परम्बूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. विजयने दोन्ही मतदारसंघांमध्ये आपल्या नावाची नोंद सी. जोसेफ विजय असं नोंदवलं आहे.

याबरोबरच टीव्हीके पक्षाचे सरचिटणीस एन. आनंद हे टी. नगर येथून निवडणूक लढवणार आहेत. तर खजिनदार व्यंकट रमणन मायलापूर आणि आधव अर्जुन विल्लिवाक्कम येथून निवडणूक लढवणार आहे. त्याशिवाय गोबीचेट्टीपालयम येथून के. सेंगोट्टयान, तिरुचेंगोडे येथून के.जी. अरुणराज, तिरुपरनकुंडम येथून सीटीआर निर्मल कुमार, थावजंड लाइट्स येथून जेसीडी प्रभाकर, कोलाथूर येथून व्ही. एस. बाबू आणि आरकेनगर येथून डॉ. मारिया विल्सन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारांच्या घोषणेबरोबरच विजय याने तरुणांसाठी अनेक मोठमोठी आश्वासनने दिली आहेत. जर टीव्हीकेचं सरकार स्थापन झालं तर २९ वर्षांवरील वयाच्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रुपये दिले जातील. तसेच ज्यांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही, अशा डिप्लोमाधारकांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही, त्यांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Vijay to Contest Elections from Two Tamil Nadu Constituencies

Web Summary : Actor Vijay's TVK party will contest Tamil Nadu elections independently. Vijay himself will contest from Trichy East and Perambur constituencies. TVK promises monthly allowances for unemployed youth and diploma holders if elected.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026