शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

प्रभू रामाचे नाव काय पाकिस्तानात घ्यायचे? अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:55 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला.

घटाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारीकेला.येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. या राज्यातील ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल, अशी आमची खात्री आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांना एखादा राजकीय नेता कसा काय रोखू शकतो?या राज्यातील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा चाललेला असताना तो अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. ममता बॅनर्जी यांनी गाडी थांबवून त्या लोकांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्या प्रकाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.एनआरसी राबविणारअमित शहा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालला ४,२४,८०० कोटी रुपये मंजूर केले. मात्र हा पैसा जनतेपर्यंत न पोहोचता तो काही विशिष्ट लोकांच्या खिशात गेला आहे. याआधीच्या यूपीए-२ सरकारने पाच वर्षामध्ये पश्चिम बंगालला फक्त १,३२,००० कोटी रुपये दिले होते. बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) योजना राबविण्यावर भाजप ठाम आहे. ईशान्य भारतात मोदी सरकारतर्फे ही योजना राबविली जात असताना त्याला ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019