प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:58 IST2025-04-10T21:55:39+5:302025-04-10T21:58:05+5:30

Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात आले.

Tahawwur Rana Extradition: First photo of terrorist Tahawwur Rana released after extradition | प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार

प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार

Tahawwur Rana Extradition: 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा(वय 64) याला गुरुवारी (10 एप्रिल 2025) भारतात आणण्यात आले. एनआयएच्या पथकाने तहव्वूरला अमेरिकेतून दिल्लीला एका विशेष विमानाने आणले. दरम्यान, भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत. 

पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाणार
तहव्वुर राणाला तिहार तुरुंग ठेवले जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

विशेष एनआयए न्यायालयात खटला चालणार
दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याने, राणाला मुंबईत पाठवले जाणार नाही. या हाय-प्रोफाइल प्रकरणात भारताच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे खटला चालवतील. त्यांच्यासोबत विशेष सरकारी वकील (एसपीपी) नरेंद्र मान हे कायदेशीर कार्यवाहीचे नेतृत्व करतील.

पाकिस्तानची हात झटकले
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने म्हटले की, तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. त्याने जवळजवळ दोन दशकांपासून त्याचे पाकिस्तानी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत. 

Web Title: Tahawwur Rana Extradition: First photo of terrorist Tahawwur Rana released after extradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.