शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देशात वेद, उपनिषद, वास्तुकलेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार : रमेश पोखरियाल निशंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:53 IST

भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचे प्रतिपादन : डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे उद्घाटनपरदेशी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करणारनवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरच

पुणे : भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे. देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आपले वेद, उपनिषद, संस्कृती, आयुर्वेद, योग, भाषा, वास्तुकला यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करावा लागेल, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी व्यक्त केले.भारतीय संस्कृती संबंध परिषद (आयसीसीआर), सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आयोजित डेस्टिनेशन इंडिया या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी निशंक बोलत होते. यावेळी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे महासंचालक अखिलेश मिश्रा, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, की सध्या विद्यापीठांंमध्ये केवळ १५ टक्के परदेशी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहतात. त्यामुळे ही अट काढून टाकावी. तसेच, परदेशी विद्यार्थी अधिक संख्येने असणाºया शहरांसाठी केंद्र सरकारने उपाययोजना आखाव्यात. डॉ. विद्या येरवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले...........आपल्या देशाला ज्ञानाचे भांडार समजले जाते. त्यामुळे देशातील चांगली महाविद्यालये -विद्यापीठे ओळखून त्याची प्रसिद्धी करणे, नवे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करणे, यूजीसी व नॅक संस्थांच्या माध्यमातून नवी मूल्यमापन पद्धती आखणे आदी उपाययोजना तातडीने कराव्या लागतील. तसेच, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.- डॉ. विनय सहस्रबुद्धे ...............परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करणारजगाच्या कानाकोपºयातून भारतात शिक्षण घेण्यासाठी येणाºया परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा, पासपोर्ट किंवा अन्य कागदपत्रे गोळा करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. यामध्ये आयसीसीआर, एआयसीटीई, यूजीसी या संस्थांच्या प्रतिनिधींसह विदेश मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकारी असतील. हे अधिकारी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.............देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या केवळ ४७ हजार असून, भारतासारख्या मोठ्या देशात ही संख्या फारच कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पाश्चत्य देशांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही.- अखिलेश मिश्रा...............नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरचदेशात तब्बल ३३ वर्षांनंतर शैक्षणिक धोरण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम मसुदा तयार केला जात आहे. लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे निशंक यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यhistoryइतिहासcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी