शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तलवार दाम्पत्याला पाहण्यासाठी झुंबड , सुटका सोमवारी: पत्रकार, हौशे सर्वांनाच उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:20 IST

बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची सुटका होणार असल्याने, डासना तुुरुंगाच्या बाहेर पत्रकारांनी शुक्रवारी एकच गर्दी केली होती.

डासना : बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची सुटका होणार असल्याने, डासना तुुरुंगाच्या बाहेर पत्रकारांनी शुक्रवारी एकच गर्दी केली होती. हे दाम्पत्य चार वर्षांपासून या कारागृहात आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने त्यांची सुटका झाली नाही. ती सोमवारी होईल, असे सांगण्यात आले.सकाळपासूनच पत्रकार कॅमेरान, छायाचित्रकार यांनी तिथे गर्दी केली होती. हे दाम्पत्य केव्हा बाहेर येते आणि आपण त्याची छायाचित्रे केव्हा काढतो, त्यांची प्रतिक्रिया केव्हा घेतो, असे मीडियातील लोकांचे झाले होते. त्याखेरीज येणारे-जाणारे, तसेच हौसे गौशे यांनीही तिथे निष्कारण गर्दी केली होती.अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दाम्पत्याची गुरुवारी निर्दोष सुटका केली. मात्र, तसे कराताना सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्या प्रकारे दाम्पत्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, त्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरेही ओढले.हे प्रकरण २००८ मधील आहे. अर्थात, आरुषीची हत्या मग केली कोणी? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. या हत्याकांडाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने दाम्पत्याच्या सुटकेविषयीही कमालीची उत्सुकता होती.डासना तुरुंगाचे अधीक्षक डॉ. दधीराम मौर्य यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला आतापर्यंत न्यायालयाचा आदेश मिळालेला नाही. या आदेशाची प्रत मिळताच त्यांना सोडण्यात येईल. राजेश तलवार यांच्यावर या आधी तुरुंगात जाताना हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आज तुरुंग परिसरात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. दंत चिकित्सक असलेले तलवार दाम्पत्य नोव्हेंंबर २०१३ पासून डासना तुरुंगात बंद आहेत. (वृत्तसंस्था)‘त्या’ घरात आता राहात नाही दाम्पत्य-नॉयडा : जलवायू विहार स्थित घर नं. एल-३२ मध्ये आता तलवार दाम्पत्य राहत नाही आणि यापुढेही राहणार नाही. तिथे अन्य कुटुंब राहते. याच घरात २००८ मध्ये आरुषी मृतावस्थेत आढळली होती. या घरात राहणारे कुटुुंब मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी शुक्रवारी काही पत्रकार दाखल झाले आणि त्यांनी घराची बेल वाजविली, पण दरवाजा उघडला गेला नाही. काही छायाचित्रकारांनी छतावर जाण्याचा प्रयत्न केला. याच छतावर हेमराजचा मृतदेह आढळला होता. मात्र, येथेही दरवाजाला कुलूप असल्याने कोणी जाऊ शकले नाही. जवळच्या अपार्टमेंटमध्ये राहणाºया काही जणांचे असे मत आहे की, हे एक ‘परफेक्ट मर्डर’ आहे. नुपूर यांचे पालक तेथून जवळच राहतात. कदाचित, काही दिवसांसाठी दाम्पत्य तिथे राहायला जातील, असा अंदाज आहे.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग