स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत दाखल
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : देशातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. घाटी रुग्णालयात आज आणखी एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण भरती झाला. हा रुग्ण जालना येथील असून तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या घाटीच्या स्वाईन फ्लू वॉर्डात दोन पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत दाखल
औरंगाबाद : देशातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. घाटी रुग्णालयात आज आणखी एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण भरती झाला. हा रुग्ण जालना येथील असून तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या घाटीच्या स्वाईन फ्लू वॉर्डात दोन पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. औरंगाबादेत दीड महिन्यापासून पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत एकूण आठ जणांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या आजाराचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. घाटीच्या स्वाईन फ्लू वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून एका पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यात आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत दाखल झाला. हा रुग्ण जालना शहरातील असून, त्याला काही दिवसांपूर्वीच स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्याला घाटील हलविण्यात आले. सध्या त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, तर आधीपासून उपचार घेत असलेल्या दुसर्या रुग्णाच्या प्रकृतीत बर्यापैकी सुधारणा झालेली असल्याचे घाटीच्या डॉक्टरांनी सांगितले. लक्षणे-संसर्ग झाल्यावर १ ते २ दिवसांत ताप येणे. -श्वास घेण्यास त्रास होणे. -धाप लागणे. -नाक चोंदणे, सर्दी होणे. -घसा खवखवणे. -क्वचितप्रसंगी अतिसार, उलट्या होणे. खबरदारी-खोकलताना किंवा शिंकताना तोंडाजवळ रुमाल धरावा.-रुमाल चार ते सहा तासांनी बदलावा.-वेळोवेळी साबणाने आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.-खोकला किंवा सर्दी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.-व्यसन टाळावे.-श्वसनाचे व्यायाम करावेत. -वाफ घ्यावी.-समतोल आहार घ्यावा.