स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला तरुणीची बेदम मारहाण, त्याची चुकी फक्त एवढीच होती की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:46 IST2022-04-15T15:46:45+5:302022-04-15T15:46:57+5:30
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणीने भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला बुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला तरुणीची बेदम मारहाण, त्याची चुकी फक्त एवढीच होती की...
जबलपूर:मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आली आहे. एक तरुणी भररस्त्यात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला बुटाने बेदम मारहाण करताना दिसत आहे. तरुणाची चूक एवढीच होती की, त्याची दुचाकी तरुणीच्या स्कूटीचा घासून गेली. यानंतर संतापलेल्या महिलेने सर्वांसमोर त्या व्यक्तीला मारहाण केली.
तरुणीने त्या व्यक्तीला बुटासोबत लाथाही मारल्या. यावेळी काही लोकांनी तिली थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती धीटपणे म्हणाली, 'मला दुखापत झाली आहे, तुम्हाला नाही.' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला बोलावून घडलेला सर्व प्रकार जाणून घेतला. यानंतर डिलिव्हरी बॉयने ओमटी पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात तक्रार दाखल केली.
ओमटी पोलीस ठाण्याचे प्रभारी एसपीएस बघेल यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी(14 एप्रिल) दुपारी 2.3 वाजता घडली. डिलिव्हरी बॉय दिलीप विश्वकर्मा (वय 25, रा. नेटल चरागणवा) यांनी फिर्यादीत सांगितले की, तो पिझ्झा डिलिव्हरीसाठी जात होता. यावेळी तरुणी समोरुन स्कूटी घेऊन आली आणि तोल जाऊन पडली. यानंतर संतापलेल्या तरुणीने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. V
मधु सिंहच्या नावावर स्कूटीची नोंदणी
ओमटी पोलिसांनी सांगितले की, वाहतूक विभागाच्या वेबसाइटनुसार, स्कूटीची नोंदणी जीआयएफ, न्यू रिछाय कॉलनी येथील रहिवासी मधु सिंग यांच्या नावावर आहे. दिलीप विश्वकर्मा याच्या तक्रारीवरून तरुणीविरोधात वाटेत अडवून अपमान आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.