स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच बोलले, घटनेबाबत म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:24 PM2024-05-22T21:24:20+5:302024-05-22T21:25:13+5:30

Swati Maliwal Case: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत होणाऱ्या मतदानापूर्वी अडचणीत आलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप मौन बाळगून असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Swati Maliwal Case: Arvind Kejriwal spoke for the first time about the Swati Maliwal beating case, said about the incident... | स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच बोलले, घटनेबाबत म्हणाले...  

स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच बोलले, घटनेबाबत म्हणाले...  

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत होणाऱ्या मतदानापूर्वी अडचणीत आलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप मौन बाळगून असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि न्याय मिळावा, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तर स्वाती मालिवाल यांनी पुन्हा एकदा आरोप करत अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

स्वाती मालिवाल यांनी केलेल्या आरोपानुसार १३ मे रोजी त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्या त्यांच्या अधिकृत निवास्थानी गेल्या होत्या.  त्यावेळी अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी मालिवाल यांना मारहाण केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेत विभव कुमार यांना अटक केली होती. दरम्यान, पीटीआयशी बोलताना अरविंद केजरीवाल सांगितले की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया दिल्यास न्यायालयीन कार्यवाहीवर प्रभाव पडू शकतो. 

केजरीवाल पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास होईल, अशी मला अपेक्षा आहे. न्याय मिळाला पाहिजे.  या प्रकरणाच्या दोन व्हर्जनची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि मग योग्य न्याय झाला पाहिजे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार हे सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. 

दरम्यान, आम आदमी पक्षामध्ये प्रत्येक नेत्यावर मला बदनाम करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, माझ्याविरोधात नेते आणि कार्यकर्त्यांची संपूर्ण फौज तैनात केल्यानंतर, मला भाजपाच्या एजंट म्हटल्यानंतर, माझं चारित्र्यहनन केल्यानंतर, एडिटेड व्हिडीओ लीक केल्यानंतर आरोपीसोबत फिरून, त्या घटनास्थळी पुन्हा फिरण्यास देऊन, पुराव्यांशी छेडछाड करून, आरोपीच्या बाजूने आंदोलन केल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये मला मारहाण झाली, ते मुख्यमंत्री प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहेत, असा टोला स्वाती मालिवाल यांनी लगावला आहे.  

Web Title: Swati Maliwal Case: Arvind Kejriwal spoke for the first time about the Swati Maliwal beating case, said about the incident...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.