शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 22:08 IST

12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका परिसरात कुख्यात गँगस्टर काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरीचे लग्न होणार आहे.

कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ ​​मॅडम मिंज यांचे उद्या, म्हणजेच 12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका भागात लग्न होणार आहे. द्वारका येथील संतोष गार्डनमध्ये हा सोहळा पार पडेल. या लग्नासाठी गँगस्टर काला जथेडीला फक्त 6 तासांचा वेळ मिळाला आहे. 6 तासांनंतर जथेडीला परत तिहार तुरुंगात नेले जाईल. दरम्यान, या दोघांच्या लग्नात पोलिसांचा कडक पहारा असेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, SWAT कमांडो आणि हायटेक शस्त्रांसह 250 पोलिसांसमोर लग्नाचे विधी पूर्ण केले जातील. तिहार जेल ते संतोष मॅरेज गार्डनमध्ये सुमारे 12 किलोमीटरचे अंतर आहे. लग्नासाठी तथेडीला कडेकोट बंदोबस्तात तिहारमधून संतोष गार्डनमध्ये नेण्यात येईल. सकाळी 10 वाजता जथेडी लग्नात पोहचेल आणि 4 वाजता त्याला परत तिहारमध्ये नेण्यात येईल.

साध्या कपड्यात पोलिस तैनाततथेडीच्या लग्नात तैनात असलेले पोलीस सूटा-बूटात पहारा देतील. यावेळी कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिसांकडे हायटेक शस्त्रे दिली जातील. या लग्नावर केवळ SWAT कमांडो, तीन राज्यांचे पोलीसच नाही तर NIA चीही नजर राहणार आहे. लग्नात काला जथेडी आणि अनुराधा यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. या कुटुंबातील सदस्यांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लग्नसराईत विशेष व्यवस्थालग्नासाठी मॅरेज गार्डमध्येही अनेक खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत बोलायचे झाले तर प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची नजर असेल. इतकंच नाही तर येथे उपस्थित असलेल्या वेटर आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. लग्नामुळे आजूबाजूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय, लग्नादरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि काला जथेडी टोळीवर पोलिसांची करडी नजर राहणार  आहे. बंबीहा आणि नीजर बवाना टोळीसह सुमारे डझनभर टोळ्या काला जथेडीचे शत्रू आहेत. त्यामुळे हे लग्न पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

टॅग्स :marriageलग्नjailतुरुंगdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी