स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद झाले; अभिनेत्रीचा तिळपापड, गांधींजींवरील ट्विट भोवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:51 IST2025-01-30T20:50:45+5:302025-01-30T20:51:11+5:30
अभिनेत्रीने याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली आहे. महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यासोबतचा फोटो यावर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आल्याचे स्वराने म्हटले आहे.

स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद झाले; अभिनेत्रीचा तिळपापड, गांधींजींवरील ट्विट भोवले?
आपल्या बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. अभिनेत्रीने याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली आहे. महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यासोबतचा फोटो यावर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आल्याचे स्वराने म्हटले आहे. एक्सने थेट अकाऊंट सस्पेंड केल्याने तिने नाराजी व्यक्त केली आहे.
मला दोन वेगवेगळ्या कॉपीराईट उल्लंघनाचा इशारा आला होता. यानंतर माझे अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे, असे तिने म्हटले आहे. स्वराने २६ जानेवारीला आणि आज ३० जानेवारीला पोस्ट केली होती. त्याचा स्क्रीनशॉट तिने इन्स्टावर पोस्ट केला आहे. २६ जानेवारीला तिने तिच्याच मुलाचा तिरंगा घेतलेला फोटो पोस्ट केला होता. तर आज तिने गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल अभी जिंदा हैं, असे टेक्स्ट असलेला फोटो पोस्ट केला होता. या दोन्हीवर कॉपीराईट आला आहे. यावरून तिने शंका व्यक्त केली आहे.
गांधींबाबतचा हा नारा एक प्रगतीशील आंदोलनाचा लोकप्रिय नारा आहे. त्यात कॉपीराईटच्या उल्लंघनाची गोष्ट येते कुठून, असा सवाल तिने केला आहे. याचबरोबर दुसरा फोटो माझ्या पोटच्या मुलीचा आहे. त्यात त्याचा चेहरा लपविलेला आहे. ती देशाचा झेंडा फडकवत आहे. कोणाला माझ्या मुलीला आवडती म्हणण्याचा कॉपीराईट आहे, असाही सवाल तिने केला आहे.
या दोन्ही गोष्टी कोणत्याही क़ॉपीराईटच्या व्याख्येत येत नाहीत. य़ा दोन्ही ट्विटना मास रिपोर्ट करण्यात आले आहे. हा मला त्रास द्यायचा प्रयत्न आहे. माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. एक्सने कृपया हे पहावे आणि आपला निर्णय बदलावा, असे स्वराने म्हटले आहे. स्वराचे ट्विटर हँडल इतरांना जरी दिसत असले तरी ती ते लॉगिन करू शकत नाहीय.