न्यूयॉर्क-दिल्ली विमानात सहप्रवाशावरच लघुशंका; भारतीय प्रवाशाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 13:13 IST2023-04-25T13:12:40+5:302023-04-25T13:13:16+5:30
भारतीय प्रवाशाला केली अटक

न्यूयॉर्क-दिल्ली विमानात सहप्रवाशावरच लघुशंका; भारतीय प्रवाशाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका भारतीयाला त्याच्या सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या आरोपाखाली येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
या भारतीय प्रवाशाने मद्यप्राशन केले होते, असे एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. सहप्रवाशासोबत झालेल्या वादानंतर या प्रवाशाने लघुशंका केली. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट एए २९२ मध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री ९ च्या सुमारास हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने या प्रवाशाला पकडले.
पीडित प्रवाशाने एअरलाइन्सकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर प्रवाशांनी सहप्रवाशांवर कथितपणे लघुशंका केल्याच्या घटना अलीकडच्या काळात नोंदल्या गेल्या आहेत.
गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझिनेस क्लासमध्ये अशीच घटना घडली होती. अशी दुसरी घटना ६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या पॅरिस-नवी दिल्ली विमानात घडली होती.