शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, घरातल्या बाथरुममध्ये नेकेड अवस्थेत सापडला दोघांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 9:50 PM

एका विवाहित जोडप्याचा त्यांच्या राहात्या घराच्या बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. थरुमचा दरवाजा उघडला तेव्हा नीरज आणि रुची दोघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

ठळक मुद्दे रात्री 9.30च्या सुमारास ते पुन्हा डिनरला जायचे असल्याने बोलावण्यासाठी म्हणून गेले. दोघांना लगेच नजीकच्या रुग्णालयात हलवले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गाझियाबाद - एका विवाहित जोडप्याचा त्यांच्या राहात्या घराच्या बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. गाझियाबादच्या ग्यान खांद येथे ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी पती-पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नीरज सिंघानिया (38) आणि रुची सिंघानिया अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. नीरज मॅट्रीक्स सेल्युलर सर्व्हीसेस लिमिटेडमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर होते. शुक्रवारी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर नीरज आणि रुची दोघेही 5.30च्या सुमारास कुटुंबियांसोबत घरी परतले.  

नीरजच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंबाने रात्री डिनरला जाण्याचा बेत आखला होता. त्यासाठी दोघे तयार होण्यासाठी म्हणून त्यांच्या बेडरुममध्ये गेले. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास नीरजचे वडिल प्रेम प्रकाश सिंघानिया त्यांना बोलावण्यासाठी म्हणून त्यांच्या रुममध्ये गेले. त्यांनी दोघांची नावे पुकारुन दरवाजा ठोठावला पण आतून काही प्रतिसाद आला नाही. रात्री 9.30च्या सुमारास ते पुन्हा डिनरला जायचे असल्याने बोलावण्यासाठी म्हणून गेले. त्यांनी दरवाजा ठोठावून दोघांच्या नावाने हाका मारल्या पण आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याची संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्यांनी नीरजच्या लहान भावाला वरुणला बोलावले. 

वरुणने दरवाजा तोडून आता प्रवेश केला. त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा नीरज आणि रुची दोघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. दोघांना लगेच नजीकच्या रुग्णालयात हलवले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही आत्महत्या आहे कि, हत्या या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. परिस्थितीजन्य पुराव्यांवरुनही काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला का ? या प्रश्नावर नीरजचे वडिल म्हणाले कि, बाथरुममधील गॅस गिझर बंद होता आणि पाण्याच्या बादल्या रिकाम्या होत्या. नीरज आणि रुचीच्या शरीरावर आवळल्याच्या किंवा कुठल्याही जखमा नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल.  

टॅग्स :Crimeगुन्हा