Sushant Singh Rajput Suicide: Sushant Singh Rajput To Be Married In November, Claims Cousin | Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा

पूर्णिया -अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या बातमीने त्याच्या गावातील लोक खूप दुःखी आहेत. सुशांतच्या निधनानं नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधले जात आहे. काही लोक नैराश्याचे कारण देत आहेत. तथापि, सुशांत डिप्रेशनमध्ये कोणत्या कारणामुळे होता हे स्पष्ट झाले नाही, कारण सुशांतची कारकीर्द चांगली चालली आहे. दरम्यान सुशांतचा चुलत भावाने या प्रकरणात आणखी नवा खुलासा केला आहे.

सुशांतचं गाव बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडीहा होते, याठिकाणी राहणारा त्याचा चुलत भाऊ पन्ना सिंहने दावा केला आहे की, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुशांतचं लग्न होणार होतं, मात्र हे लग्न कोणासोबत होणार होतं याचा खुलासा त्यांनी केला नाही. त्यांनी सांगितलं की, सुशांतचे वडील के के सिंह यांच्याशी त्यांचे मागच्या आठवड्यात बोलणं झालं होतं. जवळपास ४५ मिनिटे आमच्यात चर्चा झाली. सर्वकाही ठीक चाललंय आणि सुशांतचं नोव्हेंबरमध्ये लग्न आहे, मुंबईला जायचं आहे तयारी करा, असं काकांनी सांगितल्याचं पन्ना सिंहने सांगितले.

तसेच त्यावेळी असं काहीच वाटत नाही, काकांनी(सुशांतचे वडील केके सिंह) यांनी काही सांगितलं नाही, आता काका मुंबईला गेले आहेत, मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं पन्ना सिंह यांनी सांगितले.

सुशांतचा अकिंता लोखंडेसोबत ब्रेकअप

सुशांत सिंग राजपूत यांचे अंकिता लोखंडे हिच्याशी जवळपास सहा वर्षे संबंध होते, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. या ब्रेकअपनंतर सुशांतने म्हटले होते की अंकिताशी नातं आणि ब्रेकअप याबाबत जाणून घेण्यासाठी आता काही बाकी नाही. माझं नातं अथवा ब्रेकअपमागे माझं वैयक्तिक आहे जे मी अधिकृत सांगू शकत नाही. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअपनंतर तो दुखावला होता. अंकिता आणि सुशांत यांचे नाते पवित्रा रिश्ता या सिरियलच्या सेटवर झालं होतं, त्यानंतर २०१६ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये काही काळ अशी चर्चा रंगली होती की सुशांत सिंग राजपूतचे रिया चक्रवर्तीसोबत प्रेमसंबंध आहे. तथापि, या दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नाही. यावर्षी ११ मार्च रोजी सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकत्र दिसले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुशांत राजपूतच्या आयुष्यातील शेवटचे ३ तास कसे होते? सकाळी सर्वकाही ठीक होतं पण...

 ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची?

‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Sushant Singh Rajput To Be Married In November, Claims Cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.