शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 12:27 IST

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची आम्हाला शंका आहे.'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी आत्महत्या केली. त्याच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. नैराश्यातून सुशांतने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येने त्यांच्या चाहत्यांसोबतच कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. सुशांत आत्महत्या करू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. याच दरम्यान सुशांतच्या मामाने महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी असं म्हटलं आहे. 

'सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची आम्हाला शंका आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही' असं माध्यमांशी संवाद साधताना सुशांतच्या मामाने म्हटलं आहे. तसेच  'सुशांत हा अतिशय हुशार, देशाबद्दल, समाजाबद्दल प्रेम असणारा कलाकार होता. तो आत्महत्या करू शकत नाही. आम्ही सर्व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मागणी करतो की सरकारने या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी करावी. त्याचे देशावर आणि समाजावर प्रेम होते. त्याचं काम उत्तम सुरू होतं. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मी गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की याची केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी' अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

'कालपर्यंत एक तरुण रिअ‍ॅलिटी शोमध्ये नाचत होता तो अचानक असा निर्णय घेईल का? नाही घेणार. रोज तो त्याच्या वडिलांशी बोलत होता, कुटुंबाशी बोलायचा. आम्हाला संशय आहे. यामध्ये काहीतरी चुकीचं असल्यासारखं आम्हाला वाटत आहे. पंतप्रधान मोदींकडे मी मागणी करतो की देशाने एक राष्ट्रवादी पुत्र गमावला आहे. तो देशासाठी आणि तुमच्या मदतीसाठीही कायम उभा राहायचा. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मी मागणी करतो' असं देखील सुशांतच्या मामाने म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रंदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान एका माजी खासदाराने धक्कादायक विधान केलं आहे. सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसMumbai policeमुंबई पोलीसDeathमृत्यूBiharबिहारbollywoodबॉलिवूड