Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:42 IST2020-08-14T05:39:22+5:302020-08-14T06:42:09+5:30
Sushant Singh Rajput Death Case: चक्रवर्ती हिने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.

Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबत महाराष्ट्र पोलिसांनी राजकीय दडपणामुळे गुन्हा (एफआयआर) नोंदवला नाही की प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा पोलिसांना सहकार्य केले नाही, असे बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.
बिहार सरकार आणि रिहा चक्रवर्ती यांनी या न्यायालयात आपापले म्हणणे लेखी सादर केले. राजपूत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल चक्रवर्तीविरुद्ध पाटण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. चक्रवर्तीने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.
रिहा चक्रवर्ती म्हणाली, बिहार सरकारच्या वतीने तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) पाठवणे हे या प्रकरणात राज्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे आहे. सुशांतसिंह राजपूत हा गेल्या १४ जून रोजी मुंबईत बांद्रा उपनगरमध्ये अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस या आत्महत्येची चौकशी करत आहेत. बिहार सरकारच्या वतीने वकील केशव मोहन यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘हे तर स्पष्टच आहे की, महाराष्ट्रातील राजकीय दडपणामुळे मुंबई पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला ना वेगाने चौकशी करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी बिहार पोलिसांना सहकार्य केले.’’ वरिष्ठ वकील मैंदर सिंह म्हणाले की, या निवेदनात रिहाच्या याचिका स्थलांतरीत करण्याच्या सध्याच्या याचिकेत काहीही म्हटलेले नसल्यामुळे ती फेटाळली जावी किंवा निकाली काढली जावी.
प्रकरणाच्या सध्याच्या परिस्थितीत सीबीआयने प्रकरण हाती घ्यावे आणि तपास वेगाने करावा यात कोणताही अडथळा येऊ दिला जाऊ नये, असे बिहार सरकारने म्हटले. रिहा चक्रवर्ती गुन्हा दाखल करावा किंवा तो बदली करून घ्यावा या दोन्ही बाबी बिहार सरकारच्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या आहेत, असे रिहा चक्रवर्ती हिने म्हटले.