शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानवापी’चे सर्वेक्षण सुरू; ‘एएसआय’ला चार आठवड्यांची मुदत, तंत्रज्ञानाचा हाेणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 06:37 IST

सर्वेक्षणाला तत्काळ सुरुवात एएसआयने शुक्रवारपासूनच ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू केले. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेल्या सर्वेक्षणाला सकाळी सात  वाजता सुरुवात झाली. 

नवी दिल्ली/वाराणसी : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) वाराणसीतीलज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. दरम्यान, शुक्रवारपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून, मुस्लिम पक्षाने त्यावर बहिष्कार घातला. वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी एएसआयला सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त चार आठवड्यांची मुदत दिली.१७व्या शतकातील मशीद हिंदू मंदिराच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एएसआयला सर्वेक्षणादरम्यान तोडफोडीचे कोणतेही कृत्य करण्यास मनाई केली. त्यावर, उत्खनन करणार नाही आणि संरचनेचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी हमी एएसआयने दिली.

सर्वत्र कॅमेऱ्यांची नजरज्ञानवापी परिसराला सर्वत्र कॅमेरे बसविण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या कामाचे व्हीडिओ चित्रिकरण करण्यात येत आहे. या परिसरातील पश्चिमेकडील दरवाजावर सर्वाधिक फाेकस आहे. भिंतींचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यावरील कलाकृतींची पाहणी केली जात आहे. सर्वेक्षणाला तत्काळ सुरुवात एएसआयने शुक्रवारपासूनच ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू केले. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेल्या सर्वेक्षणाला सकाळी सात  वाजता सुरुवात झाली. 

खोदकाम नव्हे, तर असे उलगडणार सत्य- सर्वेक्षणासाठी काेणतेही खाेदकाम केले जाणार नाही. - ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर केला जाणार आहे. - जमीन किंवा भिंतीच्या आत काय आहे, हे रेडिओ वेव्ह फ्रिवेन्सीद्वारे समजते. - कार्बन डेटिंग पद्धतीचाही हाेणार वापर.- भिंती, पाया, मातीतल रंग परिवर्तनही तपासले जाईल.

सर्वेक्षणादरम्यान यांची उपस्थितीमशिदीशी संबंधित कायदेशीर वादात हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधी सर्वेक्षणादरम्यान संकुलात उपस्थित होते. तर, समितीचे सचिव सय्यद मोहम्मद यासीन यांनी सांगितले की, सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने मुस्लिम बाजूच्या वकिलांनी सर्वेक्षणात भाग घेतला नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय