शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 27, 2021 23:26 IST

पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे.

नवी दिल्ली - बंगालसह 4 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. आता सर्वजण 2 मेकडे डोळे लावून बसले आहेत. कारण 2 मेरोजीच मतमोजणी होणार आहे. निवडणूक तारखांच्या घोषणेबरोबरच आचार संहिताही लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षही मतदारांना अमिषं देत आहेत. (C voter opinion poll survey who will win in Bengal Assam Tamilnadu Kerala assembly election BJP TMC) 

पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एबीपी न्यूज आणि सी-व्होटर ओपिनियन पोलच्या माध्यमाने, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे.  

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

पश्चिम बंगालच्या बाबतीत काय सांगतो ओपिनियन पोल? - पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी पुन्हा एकदा सत्तेवर येताना दिसत आहे. ओपिनियन पोल नुसार, टीएमसीला 148-164 मिळू शकतात. त 200 हून अधिक जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या भाजपला 92 ते 108 जागांवरच समाधानी रहावे लागू शकते. या सर्व्हेनुसार, काँग्रेस आणि लेफ्ट आघाडीच्या पारड्यात 31-39 जागा येण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा जागांवरील मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता, टीएमसीला 43% तर भाजपला 38% मते मिळू शकतात. तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीला केवळ 13% मते मिळण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये 2016मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 211, काँग्रेस-लेफ्टला 76, तर भाजपला केवळ 3 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या.

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

आसाममध्ये पुन्हा भाजप सरकार? ओपिनियन पोलनुसार, आसाममध्ये भाजप आघाडीच्या खात्यात 42% मते जाताना दिसत आहेत. तर काँग्रेस आघाडीला 31% मते मिळू शकतात. याच बरोबर इतरांच्या खात्यात 27 टक्के मते जाण्याची शक्यता आहे.

पोल नुसार, 126 सदस्य संख्या असलेल्या या विधानसभेत भाजप आघाडीला 68 ते 76 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 43 ते 51 जागा मिळण्याची शक्यता आहे. आसाममध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी 64 ही मॅजिकल फिगर आहे. 

मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

पदुच्चेरीत एनडीएचं सरकार!ओपिनियन पोलनुसार, 30जागा असलेल्या पुदुच्चेरी विधानसभेत एनडीएला 46 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला 36 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांचा विचार करता एनडीएला 17 ते 21 जागा तर काँग्रेस आघाडीला 8 ते 12 जागा मिळू शकतात.

केरळमध्ये पुन्हा कम्युनिस्ट सरकार!ओपिनियन पोलनुसार, केरळमध्ये सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ला यावेळी 83-91 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)ला 47 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला येथे केवळ 0 ते 2 जागाच मिळू शकतात.

Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

तमिळनाडू डीएमके? -ओपिनियन पोलनुसार, तमिळनाडूत एआयएडीएमके आघाडीला 29 टक्के, तर डीएमके आघाडीला जवळपास 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 30 टक्के मते मुळू शकतात. जागांचा विचार करता एआयएडीएमके आघाडीला 58 ते 66 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे डीएमके आघाडी सत्तेत येताना दिसत आहे. डीएमके आघाडीला 154 ते 162 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यात केवळ 8 जागाच जाऊ शकतात.

टॅग्स :Electionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगालAssamआसामTamilnaduतामिळनाडूKeralaकेरळBJPभाजपाtmcठाणे महापालिका