Elections announced in 5 states only 5 people will be able to campaign from door to door | Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

ठळक मुद्देदेशातील च राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला या निवडणुकीत उमेदवारांना केवळ 5 लोकांना सोबत घेऊनच घरो-घरी जाऊन प्रचार करता येणार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार

नवी दिल्ली -पश्चिम बंगालसह (West Bengal) तमिळनाडू (Tamil Nadu), आसाम (Assam), केरळ (Kerala) आणि पदुच्चेरी (Puducherry) या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. यासंदर्भात आज निवडणूक आयोगाने घोषणा केली. कोरोना काळात या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा विचार करता, या निवडणुकीत उमेदवारांना केवळ 5 लोकांना सोबत घेऊनच घरो-घरी जाऊन प्रचार करता येणार आहे. यापूर्वी बिहारमध्येही कोरोना काळातच निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या आहेत. (Elections announced in 5 states only 5 people will be able to campaign from door to door)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. याशिवाय सर्व पोलिंग बुथवर सॅनिटायझर, मास्क, सोप वाटर, पिण्याचे पाणी, वीज, वेटिंग एरिया आणि व्हिल चेअर आदिंची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Assembly Elections 2021: बिगुल वाजला... देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा 

18 कोटीहून अधिक मतदार मतदाननाचा हक्क बजावतील -
या विधानसभा निवडणुकीत एकूण 824 विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून 18 कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणी मतदान केंद्र ग्रउंड फ्लोर वरच असेल. यात कसल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे ही निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटले आहे.

कोणत्या राज्यात केव्हा संपतो विधानसभेचा कार्यकाळ? -
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे 2021 रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ 1 जून 2021 रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे 2021 रोजी संपत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ संपन्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 294, आसाममध्ये 126, तामिळनाडू 234,  केरळ 140 आणि पद्दुचेरीत 30 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. 

Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

असा आहे पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रम : - 

तामिळनाडू विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान

आसाममध्ये विधानसभा निवडणूक -

पहिला टप्पा - २७ मार्च मतदान

दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान

तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान

पदुच्चेरी विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान

केरळ विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक -

पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा- 26 एप्रिल मतदान
सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान
आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Elections announced in 5 states only 5 people will be able to campaign from door to door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.