Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:50 IST2025-05-03T10:50:38+5:302025-05-03T10:50:59+5:30
Charanjit Singh Channi : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.

Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत, त्यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल असं काही म्हटलं आहे ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर कोणालाही ते कळणार नाही का? असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं आहे. चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याची ही पहिलीच वेळ नाही, पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी असंच विधान केलं होतं.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, "आधी जेव्हा हल्ला झाला तेव्हा आमचे ४० लोक मृत्युमुखी पडले, त्यावेळी निवडणुका होत्या, आजपर्यंत मला हे कळू शकलं नाही की स्ट्राईक कुठे झाला होता, लोक कुठे मारले गेले, हल्ला पाकिस्तानात कुठे झाला? जर आपल्या देशात बॉम्ब पडला तर आपल्याला कळणार नाही का? हे लोक म्हणतात की, आम्ही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केला, तसं काहीही घडलं नाही, सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, कोणालाही काहीही कळलं नाही."
हलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
चरणजीत सिंग चन्नी यांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीबद्दल सांगितले होतं की, आज पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दुसरी बैठक होती. काँग्रेसने सरकारला आश्वासन दिलं आहे की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दहशतवाद संपवण्यासाठी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आम्ही सरकारसोबत आहोत. पहलगाम मुद्द्यावरील विधानं टाळली पाहिजेत असं काँग्रेस हायकमांडने स्पष्ट केलं असतानाच चन्नी यांनी पुरावे मागितले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर विभागाने डिजिटल हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.