शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

शिवसेनेच्या दबावामुळे सुरेश प्रभू मंत्री नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 3:56 AM

सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती.

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सुरेश प्रभू यांचा समावेश नसल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागच्या मंत्रिमंडळात प्रभू यांचा समावेश शिवसेनेचा विरोध असूनही होता. त्यांची सरकारचे कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख होती.परंतु, यावेळी शिवसेनेच्या दबाबापुढे भाजपला वाकावे लागले. शिवसेनेकडून भाजपवर प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही, असे दडपण होते. याच कारणामुळे प्रभू मंत्री बनू शकले नाहीत, असे मानले जात आहे.

सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती. परंतु, शिवसेनेला हे समजताच तिने त्यांना विरोध सुरू केला.शिवसेनेसोबत प्रदीर्घकाळ शांतता राखण्यासाठी भाजपने प्रभू यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.मित्रपक्षांसोबत तणातणीभाजपचा त्याच्या मित्रपक्षांसोबत मंत्रिमंडळावरून समन्वय पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसत नाही. याचे संकेत फक्त जदने (यु) मंत्रिमंडळात सहभागी न होऊन दिले, असे नाही तर उत्तर प्रदेशातून अपना दलदेखील सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. याच प्रकारे दक्षिणेतूनही कोणता मोठा सहकारी पक्ष मोदी सरकारमध्ये आलेला नाही.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूShiv SenaशिवसेनाBJPभाजपा