सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:02 IST2025-04-12T06:02:28+5:302025-04-12T06:02:59+5:30
Suresh Prabhu: माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. मान्यताप्राप्त जागतिक आर्थिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेवर नियुक्ती झालेले ते एकमेव भारतीय ठरलेत.

सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती
नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. मान्यताप्राप्त जागतिक आर्थिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेवर नियुक्ती झालेले ते एकमेव भारतीय ठरलेत.
२०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे व्यासपीठ जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी संवाद आणि चर्चा घडवून आणण्याचे कार्य करते. या सल्लागार मंडळावर इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती जोको विडोडो, आयएमएफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि इतर अनेक मान्यवर आहेत.
सहा वेळा खासदार राहिलेले सुरेश प्रभू हे वाजपेयी सरकारमध्ये तसेच मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. त्यांनी उद्योग, ऊर्जा, पर्यावरण व वने, रेल्वे, नागरी उड्डयन, वाणिज्य व उद्योग इत्यादी अनेक मंत्रालयांचा कार्यभार सांभाळलेला आहे. प्रसिद्ध सनदी लेखापरीक्षक (सीए) असलेले प्रभू हे सध्या हरयाणाच्या सोनीपत येथील ऋषिहुड विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते अतिथी प्राध्यापकही आहेत.