शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मोबाईलवर गाणी लावली अन् बायकोसोबत खेळत होता गरबा; अचानक चक्कर आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 12:45 IST

एक दाम्पत्य आपल्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होतं. त्याच दरम्यान तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला.

गुजरातच्या सूरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एक दाम्पत्य आपल्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होतं. त्याच दरम्यान तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरत लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आकार रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या दीपक पाटील यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. दीपक पाटील हे मूळचे मालेगावचे आहेत. पत्नी देविकासोबत ते सूरतला वास्तव्यास होते. हिऱ्यांच्या कंपनीत ते नोकरी करत असल्याची माहिती मिळत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने 30 सप्टेंबरच्या रात्री दीपक पत्नी आणि मित्राच्या कुटुंबासोबत गरबा खेळण्यासाठी जाणार होते. 

मित्राच्या घरी अचानक पाहुणे आल्याने त्यांना हा गरब्याचा प्लॅन रद्द करावा लागला. त्यामुळे दीपक आणि देविकाने आपल्या फ्लॅटच्या हॉलमध्ये गरबा खेळायचं ठरवलं. मोबाईलवर गाणी लावून दोघांनी ठेका धरला. गरबा खेळता खेळता देविका थकल्या. त्या एका जागी बसल्या. मात्र दीपक गरबा खेळत होते. रात्री दहाच्या सुमारास दीपक यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन पडले.

देविका यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने दीपक यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दीपक आणि वेदिका यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. दीपक यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल रविंद्र करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Navratriनवरात्री