शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:21 IST

DeveGowda Family Rapist, Revanna Sex Scandal Case: गेल्या वर्षी २३ जूनला एमएलसी सूरज रेवण्णा याने जेडीएसच्याच एका तरुण कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार केले होते.

वर्ष दीड वर्षापूर्वी कर्नाटकात एक मोठा लैंगिक अत्याचाराचा बोभाटा झाला होता. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या मुलाने, नातवांनी शेकडो महिलांचे आयुष्य नासविले होते. या महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या नेतेमंडळींनी केवळ महिलांचेच नाही तर पुरुषांचेही आयुष्य नासवत त्यांच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला होता. याला आता वर्ष होत आले असून देवेगौडांचा नातू जो कर्नाटकचा विधानपरिषद आमदार आहे तो मोकाट बाहेर फिरत आहे, तर ज्याच्यावर त्याने अत्याचार केले तो पुरुष मात्र सीबीआयच्या नजरकैदेत आहे. 

 गेल्या वर्षी २३ जूनला एमएलसी सूरज रेवण्णा याने जेडीएसच्याच एका तरुण कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. त्याला त्याने गन्निकडाच्या फार्महाऊसवर बोलविले होते. विचारपूस करून त्याला रेवण्णाने आपले पाय दाबायला लावले. मग तो वाकल्याचे पाहून त्याने त्या कार्यकर्त्याच्या कंबरेला स्पर्ष करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्याने त्याला रोखले तर त्याने जिवानिशी मारण्याची धमकी दिलेली. यानंतर या पिसाटलेल्या सूरज रेवण्णाने त्याच्यावर बलात्कार केला होता. 

या तरुण कार्यकर्त्याच्या आरोपांनंतर पोलिसांनी रेवण्णाला अटक केली होती. एक महिना तो कस्टडीमध्ये होता, परंतू आता हा पिसाटलेला रेवण्णा खुलेआम फिरत आहे. बेंगळुरूच्या एका न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात सूरजला 23 जुलैला जामीन मंजूर केला होता.  सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतू अद्यापही सीआयडीला काही केल्या आरोपपत्र दाखल करता आलेले नाही. रेवण्णा हा मोठ्या राजकारणी घराण्याचा कुलदीपक असल्यानेच त्याच्यावर कारवाई करण्यात येत नाहीय. 

प्रकरण घडले तेव्हा देशभरात मुद्दा उठला होता, तो आता हळूहळू चर्चेतून बाजुला पडला आहे. याचाच फायदा हे राजकारणी घेत आहेत. सूरजवर आरोप करणारा कार्यकर्ता इतका घाबरला आहे की तो गेल्या एक वर्षापासून माध्यमांसमोर येण्याचे धाडस करू शकला नाही. गेल्या एक वर्षापासून तो सीबीआयच्या देखरेखीखाली आहे. सूरजचा धाकटा भाऊ प्रज्वल रेवण्णा याला ३१ मे २०२४ रोजी एका सेक्स स्कँडलमध्ये अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :h d deve gowdaएच. डी. देवेगौडाMolestationविनयभंगCBIगुन्हा अन्वेषण विभाग