शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सुप्रीम कोर्टामुळे बोथट झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकार पुन्हा करणार कडक, विधेयक मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 6:25 AM

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.हे विधेयक याच अधिवेशनातच मांडून ते मंजूर करून घेतले जाईल, असे समजते. विरोधी पक्ष दलित हिताच्या या विधेयकास विरोध करणार नाहीत व ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ सर्वसंमतीने पूर्वस्थितीत आणला जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.दलित संघटनांनी या निकालाचा निषेध केलाच होता, परंतु गेल्या चार महिन्यांत काहीच हालचाल न दिसल्याने सरकारची दलितविरोधी अशी प्रतिमा समाजात निर्माण झाली. त्यातच हा निकाल देणारे न्या. ए. के. गोएल यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणावर अध्यक्षपदी नेमणूक केल्याने दलित संतप्त झाले. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने त्वरित कायदा करावा व न्या. गोएल यांना अध्यक्षपदावरून हटवावे, यासाठी रेटा लावला. एवढेच नव्हे, तर सरकारला आमचा पाठिंबा गृहित धरू नये, असेही सांगितले. रामदास आठवले यांनीही ही मागणी लावून धरली. त्यातच दलित संघटनांनी ९ आॅगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे हे कायदा दुरुस्ती विधेयक तातडीने मांडण्याचे ठरले.संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, या विधेयकाचा तपशील सांगण्यास कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी असमर्थता दर्शविली. अनुसूचित जाती व जमातींचे हित जपण्यासाठी कोणत्याही थरास जाण्याची सरकारची तयारी आहे, असे ते म्हणाले.पासवान यांनी मात्र विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे व ते याच अधिवेशनात मांडले जाईल, असे अधिकृतपणे जाहीर केले. जे कोणी या विधेयकास विरोध करतील, ते स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतील, असे पासवान म्हणाले. सरकारला दलितविरोधी म्हणणाऱ्यांना या निर्णयाने जोरदार चपराक मिळाली आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.या विधेयकात काय आहेत तरतुदीकोणत्याही न्यायनिर्णयात काहीही म्हटले असले, तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यापूर्वी तक्रारीच्या खरेपणाची कोणतीही शहानिशा करण्याची गरज असणार नाही, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीन मागण्याचीही सोय असणार नाही.आरोपीस अटक करायची की नाही, हे ठरविण्याचा अधिकार दंड प्रक्रिया संहितेने तपासी अधिकाºयास दिलेला आहे. तो प्राथमिक चौकशीच्या नावाने काढून घेतला जाऊ शकत नाही किंवा त्या अधिकारावर मर्यादाही घालता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी हा निकाल दिला तेव्हाच तो आपल्याला मान्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका करू व वेळ पडली तर वटहुकूमही काढू, असेही त्या वेळी सरकारने म्हटले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय