शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

Coldrif Syrup: कोल्ड्रिफ सिरपमुळे १६ मुलांचा बळी! प्रकरण सुप्रीम कोर्टात, सीबीआय चौकशीसह साठा जप्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:56 IST

Coldrif Cough Syrup: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरप प्यायल्याने अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरपमुळे अनेक निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले. हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण घटनेची सत्यता समोर यावी, यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली, ज्यात सीबीआय चौकशीसह साठा जप्त करण्याची मागणी करण्यात आली.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरपच्या प्यायल्यामुळे आतापर्यंत एकूण १८ मुलांच्या मृत्युची नोंद करण्यात आली. तपासणीमध्ये या सिरपमध्ये ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन आढळले आहे, ज्यामुळे किडनी निकामी होण्याची दाट शक्यता असते. संभाव्य धोका लक्षात घेऊन वकील विशाल तिवारी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय न्यायिक तज्ञ समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी. या घटनेशी संबंधित सर्व एफआयआर तातडीने सीबीआयकडे सोपवण्यात यावेत. बंदी घालण्यात आलेल्या 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचा सध्याचा संपूर्ण साठा तातडीने जप्त करण्यात यावा.कफ सिरपचे उत्पादन, नियमन, चाचणी आणि वितरण या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली.

केंद्र सरकारने देशातील सहा राज्यांमधील १९ औषध उत्पादन युनिट्सची जोखीम-आधारित तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटिसा बजावून या बनावट औषधांच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Coldrif Syrup Deaths: Supreme Court Petition Seeks CBI Probe, Stock Seizure

Web Summary : Following deaths in Madhya Pradesh and Rajasthan linked to Coldrif syrup, a petition in the Supreme Court demands a CBI probe and seizure of the syrup's stock. The syrup contained a toxic chemical, leading to kidney failure. A thorough investigation of the drug's production and distribution is requested.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान