शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

महापराक्रमी युद्धनौका INS Viraat वाचणार? सुटे भाग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 2:33 PM

INS Viraat's Dismantling Kept On Hold : सर्वोच्च न्यायालयाने 'आयएनएस विराट' या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्याच्या (डिस्मेंटल) निर्णयाला स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देएन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली : भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या 'आयएनएस विराट' (INS Viraat) या युद्धनौकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 'आयएनएस विराट'चे सागरी संग्रहालय आणि मल्टीफंक्शनल अॅडव्हेंचर सेंटरमध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 'आयएनएस विराट' या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्याच्या (डिस्मेंटल) निर्णयाला स्थगिती दिली आहे. ( SC stays dismantling of decommissioned aircraft carrier INS Viraat, know why )

भारतीय नौदलात ३० वर्षे सेवा केलेल्या 'आयएनएस विराट' या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्यासाठी आणि भंगार म्हणून विकण्याचा निर्णय जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 'आयएनएस विराट' या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्याच्या (डिस्मेंटल) निर्णयाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ए. एस. बोपण्णा व व्ही. रामसुब्रमण्यम यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय दिला आहे.

जगात सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका अशी 'आयएनएस विराट'ची ओळख असून, ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती. मार्च २०१७ मध्ये 'आयएनएस विराट'ला नौदलाच्या सेवेतून निवृत्त करण्यात आले होते. त्यानंतर 'आयएनएस विराट'वर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता, पण जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्यानेच ही युद्धनौका मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यानंतर गेल्या वर्षी श्रीराम ग्रुपने (Shriram Group) ही युद्धनौका ३८.५४ कोटी रुपयांना खरेदी केली होती आणि त्यानंतर डिसेंबरपासून गुजरातमधील भावनगर इथल्या अलंग शिपयार्डमध्ये ती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. (INS Viraat: Here's Everything You Need to Know About India's Longest Serving Warship)

दरम्यान, एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी 'आयएनएस विराट' या जहाजाला सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी गोव्यातील झुवारी नदीत डॉक केले जाईल. या प्रकल्पासाठी गोवा सरकारही पुढे आले आहे आणि यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला एक पत्रही लिहिले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय