शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनेतील उदासीनतेमुळे महाराष्ट्रात बांधकामांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 08:51 IST

सुप्रीम कोर्टाकडून अनेक राज्यांची कानउघाडणी

नवी दिल्ली : घन कचरा व्यवस्थापनाबद्दल धोरण न आखल्यानं सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांची कानउघाडणी केली आहे. कचरा व्यवस्थापनाबद्दल बहुतांश राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची भूमिका अतिशय निराशाजनक असल्याचं न्यायालयानं म्हटलं. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अद्याप घन कचरा व्यवस्थापनासाठी कोणतंही धोरण आखलेलं नाही. त्याबद्दल न्यायालयानं तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण न आखल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील बांधकामांना स्थगिती दिली आहे. घन कचरा व्यवस्थापनाचं धोरण आखण्यात दिरंगाई करणाऱ्या सर्व राज्यांना न्यायालयानं 3-3 लाखांचा दंड ठोठावला आहे. राज्य सरकारांकडून प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात न आल्यानं हा दंड ठोठावण्यात आला. लोकांनी अस्वच्छ वातावरणात आणि कचऱ्यात राहावं असं जर राज्य सरकारांना वाटत असेल, तर आम्ही काय करु शकतो, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. 'महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंदिगढ यांच्यासारख्या राज्यांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी अद्याप धोरण आखलेलं नाही. दोन वर्षांपासून यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र तरीही काही राज्यं याबद्दल उदासीन आहेत,' असं न्यायालयानं म्हटलं. राज्य सरकारं लोकांच्या हिताचा विचार करत असतील, त्यांना शहरं स्वच्छ ठेवायची असतील, तर त्यांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण आखायला हवं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. राज्य सरकारांनी ही बाब गंभीरपणे घ्यावी. जोपर्यंत राज्य सरकारांकडून घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण तयार केलं जात नाही, तोपर्यंत बांधकामांवरील स्थगिती कायम असेल, असं म्हणत न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली.  

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न