शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
5
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
6
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
7
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
8
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
9
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
10
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
11
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
12
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
13
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
14
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
15
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
16
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
17
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
18
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
19
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
20
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

CoronaVirus: वार्तांकनापासून माध्यमांना थांबवू शकत नाही: सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:24 PM

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत माध्यमांंना रोखू शकत नाही, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची याचिका फेटाळलीमाध्यमांना थांबवू शकत नाही सांगत आयोगाला न्यायालयाने फटकारलेमद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाला आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील न्यायसंस्था आणि निवडणूक आयोग यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवत फटकारले होते. यानंतर प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली होती. (supreme court slams election commission over media reporting)

मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली होती. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसारसभा घ्यायला परवानगी दिल्यावरून फटकारले होते. निवडणूक आयोगावर खूनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे म्हटले होते. न्यायालयाचे मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या खूनाच्या गुन्हा दाखल करण्याच्या विधानाला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

“पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

माध्यमांना थांबवू शकत नाही

निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालय जी मते व्यक्त करते, त्यांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चपराक लगावली. न्यायालयाकडून तोंडी व्यक्त केली जाणारी मते प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना थांबवायला हवे. तसेच न्यायालयाच्या तोंडी मतावरून गुन्हेगारी तक्रार दाखल करू शकत नाही, असा युक्तिवाद केल्यानंतर न्या. चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयात होणाऱ्या चर्चेच वार्तांकन न करण्यास माध्यमांना सांगू शकत नाही. अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा वकील आणि न्यायाधीशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये माध्यमे पहारेकरी आहेत, असे न्यायालयाने म्हटले. 

ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

दरम्यान, आमची प्रतिमा डागाळली, असे सांगत निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रसारमाध्यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत आणि केवळ निकालात नोंदवलेल्या निरीक्षणाचा अहवाल द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेत म्हटले होते. तसेच माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे, असे आयोगाने याचिकेत स्पष्ट केले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय