शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

By महेश गलांडे | Updated: November 11, 2020 15:13 IST

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे.

नवी दिल्ली - अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून काल मुंबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर, आम्ही न्यायालय म्हणून त्यांच्या मदतीसाठी आहोत, हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. अर्णब गोस्वामींच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या वकील हरिश साळवे यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तर, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले असून त्यांची बाजू ऐकल्याशिवास निर्णय देऊ नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे

आपली लोकशाही सर्वसाधारणपणे लवचिक आहे, महाराष्ट्र सरकारने हे सर्व दुर्लक्षित केलं पाहिजे. 

जर एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने आणली तर, हे न्यायाचे अध:पतन होईल. 

महाराष्ट्र सरकारला याप्रकरणात कोठडी देऊन चौकशीची गरज वाटते?

आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा करत आहोत. 

जर संवैधानिक न्यायालय हस्तक्षेप करत नसेल तर आपण विनाशाच्या वाटेनं आहोत. 

आम्ही याप्रकरणी सुनावणी करत आहोत, कारण उच्च न्यायालयाने जामीन दिला नाही आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षणही केलं नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब यांना सत्र न्यायालयात जाण्याचे सुचवले होते. त्यानुसार अर्णब हे अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज काल दाखल केला होता. त्यानंतर मुंबई  उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णब यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सुट्टीकालीन खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी घेण्यात येत आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने  सोमवारी हिरवा कंदील दाखवला. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले असून, तिथेच  दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना  दिली आहे. तर उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने  गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अर्णब गोस्वामी यांना देण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी जिल्हा  सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. गोस्वामी यांची न्यायालयीन कोठडीतच पोलीस चौकशी करता यावी यासाठी रायगड पोलिसांनी तीन तासांची वेळ मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली आहे.   

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी