शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

आरबीआयच्या मागे लपू नका, भूमिका स्पष्ट करा; व्याजवसुलीवरून केंद्राची 'सर्वोच्च' कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:53 PM

आठवड्याभरात शपथपत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाच्या केंद्राला सूचना

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात बँकांना ग्राहकांकडून ईएमआय वसूल न करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अनेक बँकांनी व्याज वसुली सुरूच ठेवली. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयानं सरकारला सुनावलं.आपत्ती प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत सरकारला विशेष अधिकार आहेत. त्यांचा वापर करून सरकार ईएमआयवरील व्याज माफ करून लोकांना दिलासा देऊ शकतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. कोरोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट, बेरोजगार, पगार कपात या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं देशातल्या बँकांना ईएमआय वसुली करताना नरमाईचं धोरण स्वीकारायचे आदेश दिले होते. ग्राहकांकडून ३१ ऑगस्टपर्यंत ईएमआय घेऊ नका, अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली होती. ३१ ऑगस्टपर्यंत ग्राहकांकडून सामान्य दरानं व्याजाची वसुली करण्याची परवानगीदेखील बँकांना देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. व्याज माफ करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची कानउघाडणी केली. आरबीआयच्या मागे लपून केंद्र सरकार जबाबदारी टाळू शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं.'सरकारला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत राहून निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ईएमआयवर बँका करत असलेली व्याज वसुली रोखण्याचे अधिकार सरकारला आहेत. मात्र सरकार ते वापरत नाही,' अशा शब्दांत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. त्यावर महाधिवक्ते तुषार मेहतांनी सरकारची बाजू मांडली. 'सरकार आरबीआयसोबत काम करत असून कर्जदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारचा दृष्टीकोन आरबीआयपेक्षा वेगळा असू शकत नाही,' असा युक्तिवाद मेहतांनी केला. न्यायालयानं या प्रकरणी आठवड्याभरात शपथपत्र सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय